महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन
सातारा – महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी जयंत वीर नायब तहसीलदार सामान्य शाखा, अनिल जाधव निवडणूक नायब तहसीलदार व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.



