सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे यांची स्थानिक टॅक्सी युनियनला सदिच्छा भेट
केला नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार
महाबळेश्वर (प्रतिनिधी) आज समाजसेवक किरण गोरखनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथिल टॅक्सी यूनियनच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी नूतन अध्यक्ष जावेदभाई वारूनकर व उपाध्यक्ष बबनदादा ढेबे यांचा किरण शिंदे यांनी शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच भावी कार्यास सदिच्छा दिल्या. या प्रसंगी मावळते अध्यक्ष अशोक ढेबे,रज्जाक डांगे,अंकुश नाना बावळेकर, अप्पा भिलारे,बबलू मुलाणी,फारूक वारूनकर,फारूक इब्राहिम वारूनकर, अतिश साळुंखे,भरत वरपे,कल्पेश पारटे,जावेदभाई, सम्यक शिंदे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आप्पा भिलारे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले, किरण शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर आप्पा भिलारे यांनी आभार प्रदशिर्त केले.