कौशल्ये विकसित मनुष्यबळाचे ध्येय ठेवून स्क्वेअर वे ऑटोमेशनची वाटचाल-श्रीरंग काटेकर.
प्रशिक्षणार्थ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान. 48 गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविले
सातारा… कुशल व कौशल्य विकसित मनुष्यबळाचे ध्येय ठेवून स्क्वेअर वे ऑटोमेशनची यशस्वी वाटचाल सुरू असून इंडस्ट्रीला पूरक ज्ञानाने समृद्ध मनुष्यबळ निर्मिती या माध्यमातून होत आहे. असे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले. ते ता.जि. सातारा येथे स्क्वेअर वे ऑटोमेशन च्या कौशल्य विकसित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी साताऱ्यातील नामांकित सी.ए सुधाकर कुलकर्णी यशोदा पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ प्रवीणकुमार गावडे डॉ एन एम जमादार अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे संचालक डॉ वैभव राऊत डॉ तुषार शेंडे डॉ दिपाली शिंदे स्क्वेअर वे ऑटोमेशन चे संचालक तुषार इनामदार संचालिका हर्षदा इनामदार आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना सी ए सुधाकर कुलकर्णी म्हणाले की संपूर्ण जगात नव्याने क्रांती होत आहे यामध्ये कौशल्य विकासाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे विद्यार्थ्यांनी काळाची पाऊले ओळखून आपले उज्वल करिअर कशात आहे हे ओळखावे. यशोदा पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रवीणकुमार गावडे म्हणाले की इंडस्ट्रीला आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित मनुष्यबळाची नितांत गरज आहे. काळाची गरज ओळखून स्क्वेअर वे ऑटोमेशनने विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करण्याचे जबाबदारी स्वीकारले आहे. अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉ वैभव राऊत म्हणाले की स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना तंत्र कौशल्याचे ज्ञान अवगत होणे गरजेचे आहे भविष्यात ज्या विद्यार्थ्यांकडे आधुनिक तंत्र कौशल्याचे ज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्वल राहणार आहे. प्रारंभी स्क्वेअर वे ऑटोमेशनचे कार्यप्रणाली याबद्दल माहिती विशद करताना संचालक तुषार इनामदार म्हणाले की आधुनिकतेच्या युगात कोणताही घटक कौशल्य विकासापासून वंचित राहू नये म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत इंडस्ट्री मधील कार्यप्रणाली व त्यांना आवश्यक असणारा मनुष्यबळ पुरवठा करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून त्याबाबतचे कौशल्य व प्रशिक्षण आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो. यावेळी कौशल्य विकसित प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण कार्यकाळात आलेले अनुभव व झालेला लाभ याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंत इनामदार विश्वास लिमये विराज शिंदे तेजस इनामदार पूर्वा शेळके यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव नगरकर प्रास्ताविक रिमझिम शहा व आभार तुषार इनामदार यांनी मानले.
स्किल बेस्ड एज्युकेशन या संकल्पनेवर आधारित ज्ञानाचे कवाडे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्वेअर वे ऑटोमेशन यांचे प्रयत्न सुरू आहेत देशांतर्गत इंडस्ट्रीला नाविन्यपूर्ण कौशल्य विकसित विद्यार्थ्यांची गरज आहे ती गरज ओळखून स्क्वेअर वे ऑटोमेशन अभ्यासक्रमाची आखणी केली आहे याचा लाभ विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास वाढीस होत आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धा पाहता भारतीय विद्यार्थ्यांमध्येही कौशल्य विकास बाबतचे जनजागृती होणे काळाची गरज आहे त्या दृष्टीने स्क्वेअर वे ऑटोमेशन विद्यार्थ्यांवर परिश्रम घेत आहे.





