Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » अविष्कार संशोधन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो – श्रीरंग काटेकर

अविष्कार संशोधन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो – श्रीरंग काटेकर

अविष्कार संशोधन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो – श्रीरंग काटेकर

गौरीशंकरचे सहा विद्यार्थी चमकले, विद्यापीठाच्या विभागीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी.

 लिंब – दर्जात्मक व गुणात्मक ज्ञानदानातून सक्षम विद्यार्थी घडवणाऱ्या गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव व गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयातील एकूण सहा विद्यार्थ्यांनी औषधनिर्माणशास्त्र शाखेत सर्वात महत्त्वपूर्ण मानली जाणारी अविष्कार संशोधन स्पर्धेत नेञदिपक कामगिरी करून महाविद्यालयाचा शैक्षणिक नांवलौकिक उंचाविला आहे. या विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशाचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब ता.जि. सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालय येथे यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते .

यावेळी देगाव फार्मसीचे प्राचार्य डॉ. नागेश अलुरकर, डॉ. मनोज शिंदे, प्रा. स्पर्षा बांदेकर, लिंब फार्मसीचे प्राचार्य डॉ. योगेश गुरव, प्रा. डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा. किर्ती माने, प्रा. शुभम चव्हाण, प्रा. सायली दळवी, प्रबंधक निलेश पाटील अदि प्रमुख उपस्थित होते.

 श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की मानवी जीवनातील बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आजार व त्यावर परिणामकारक औषध निर्मितीसाठी औषध निर्माण क्षेत्रात नवसंशोधन होणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला अधिक चालना देऊन याबाबत नवनिर्मिती घङणे काळाची गरज आहे.

 सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगावचे प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर म्हणाले औषध निर्मिती क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी बदलत्या परिस्थितीशी जळवून घेणे गरजेचे आहे मानवी शरीरात निर्माण होणारे विविध आजार विशेषतः दुर्धर आजारावर परिणामकारक औषध निर्मिती हे एक आव्हान आहे .

लिंब कॅम्पसचे प्राचार्य डॉ.योगेश गुरव म्हणाले की औषध निर्माण शाखेतील ज्ञान घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना जीवनात एक तरी संशोधनावर आधारित औषध निर्मिती करून स्वतःला सिद्ध करावे विद्यार्थ्यांनी भविष्यात निर्माण होणारे आजार व त्यावर नव संशोधनाचा ध्यास घेऊन वाटचाल करावी.

 प्रारंभी नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पेढ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरी यांनी आयोजित केलेल्या विभागीय विद्यापीठ स्तरावरील आविष्कार संशोधन स्पर्धेत यशस्वी झालेल्या सातारा कॉलेज फार्मसी देगाव च्या विद्यार्थिनी धनश्री जाधववर, आकांक्षा पवार, सिद्धी जाधव तसेच गौरीशंकर बी फार्मसी लिंबचे गीतांजली होले ,श्रावणी गिरी गोसावी, प्रवीण नाळे यांना बुके व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर, प्राचार्य डॉ.योगेश गुरव, डॉ. धैर्यशील घाडगे डॉ.मनोज शिंदे, , प्रा. स्पर्षा बांदेकर प्रा. किर्ती माने यांनी मार्गदर्शन केले. तसेच अविष्कार संशोधन कमिटीचे सदस्य प्रा. दुधेश्वर क्षीरसागर ,प्रा. शुभम चव्हाण ,प्रा. सायली दळवी याचे विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले.

प्रास्ताविक व आभार संजय देशमाने यांनी केले.

चौकट: औषधनिर्माणशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांना नवसंशोधानात्माक्तेची वृत्ती वाढीला लागावी व या क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन व्हावे या उद्देशाने विद्यापीठ राज्य व राष्ट्रीय स्तरावर संशोधन स्पर्धेचे आयोजन केले जाते यामध्ये विद्यार्थी उत्स्फूर्त सहभाग घेतात या स्पर्धेत यशस्वी होणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते गौरीशंकर फार्मसी चे विद्यार्थी या स्पर्धेत नेहमीच चमकदार कामगिरी करून महाविद्यालयाच्या नाव लौकिकात भर घातली आहे शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये विद्यापीठ स्तरावर घेतलेल्या अविष्कार संशोधन स्पर्धेत सहा विद्यार्थ्यांनी बाजी मारून महाविद्यालयाच्या शैक्षणिक शिरपेचात त्यांनी मानाचा तुरा रोवला आहे.

उज्वल यशाबदद्ल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलींद जगताप, संचालक डॉ. अनिरुध्द जगताप, संचालक जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, कायदेशीर मॅनेजर रवी जगताप, देगाव कॉलेजचे प्रबंधक हेमंत काळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 20 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket