श्री दत्त जयंती महाबळेश्वर येथे उत्साहात साजरी
महाबळेश्वर प्रतिनिधी :विद्युतरोषणाई, फुलांची आकर्षक सजावट आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांनी शनिवारी महाबळेश्वर शहरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अभिषेक, महापूजा, आरती, यांसह भजन-कीर्तन, प्रवचन, व्याख्याने आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. श्री दत्त गुरूंच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला.
श्री दत्त जयंती सोहळा महाबळेश्वर शहरांमध्ये एकात्मतेचे संदेश देणारा असतो.सर्व धर्म समभाव या सद्भावनेने श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येते असते.शहर व परिसरातील अन्नदात्यांच्या माध्यमातून जवळपास 7 ते 8 हजार भाविक महाप्रसाद घेतात.यामध्ये 13 डिसेंबर पासून दोन दिवसाचा हा दत्त जयंती सोहळा संपन्न होत असतो.श्री दत्त पादुकांना श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे महाभिषेक होतो सकाळी 6 वाजता श्री दत्तगुरूना अभिषेक व 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा 12 वाजता श्री दत्तगुरू जन्म सोहळा संपन्न झाला.दुपारी 1 वाजले नंतर महाप्रसाद वितरण समारंभ होत असतो तो रात्री उशिरापर्यंत सुरू असतो पूर्ण दिवसभर सुस्वर भजन मंडळांचा कार्यक्रम संपन्न होत असतो सोहळा संपन्न करण्यासाठी श्री दत्त मंदिर कमिटी टॅक्सी युनियन व टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी अथक प्रयत्न करत असतात.
श्री दत्तमंदिर कमिटी चे अध्यक्ष श्री. दत्तात्रय जाधव यांच्या नेतृत्वात,उपाध्यक्ष श्री युसुफ मुजावर,सचिव संतोष डोईफोडे व सर्व संचालक मंडळ आणि टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष श्री जावेद वारूनकर,उपाध्यक्ष श्री बबन ढेबे सचिव श्री सी डी बावळेकर आणि सर्व संचालक मंडळ व सर्वच सभासद मोठ्या हिरहिरीने सहभागी होत असतात.