Home » राज्य » शिक्षण » श्रीपतराव पाटील हायस्कूल मधील विद्यार्थिनी रंगल्या पारंपारिक खेळात

श्रीपतराव पाटील हायस्कूल मधील विद्यार्थिनी रंगल्या पारंपारिक खेळात 

श्रीपतराव पाटील हायस्कूल मधील विद्यार्थिनी रंगल्या पारंपारिक खेळात 

सातारा: करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल मध्ये नागपंचमी सणानिमित्त वेगवेगळे पारंपारिक खेळ खेळण्यात आले. भारतीय संस्कृतीतील समाज हितावह रूढी, परंपरा जोपासणे व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करणे या उद्देशाने या पारंपारिक खेळाचे आयोजन संस्था सचिव तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आले होते.

        यावेळी विद्यार्थिनींनी पारंपारिक खेळांचा मनमुराद आनंद घेतला. झिम्मा, फुगड्या, फेरावरची गाणी , पिंगा, किस बाई किस यासारखे पारंपारिक खेळ शिक्षिका व विद्यार्थिनींनी एकत्र खेळले व खेळाचा आनंद लुटला. यावेळी सर्व विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर मागील पिढीकडून पुढील पिढीला नवीन काहीतरी मिळाल्याचा एक वेगळाच आनंद दिसून आला.

     याचबरोबर वर्षभरातील सर्व सणांच्या निमित्ताने नवीन पिढीला रीती -रिवाज, प्रथा ,परंपरा भारतीय सण व भारतीय संस्कृतीचे महत्त्व कळावे, त्याबद्दल माहिती व्हावी यासाठी सर्वच सण आणि उत्सव शाळेमध्ये साजरे केले जातात.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमरसिंह वसावे, पर्यवेक्षक यशवंत गायकवाड व सर्वच शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Post Views: 91 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद महाबळेश्वर:महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक

Live Cricket