Post Views: 99
श्री भैरवनाथ विद्यामंदिर केळघर येते पर्यावरण पुरक आकाश कंदील कार्यशाळा.
मेढा प्रतिनिधी -विद्यालयात मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, यासाठी आकाश कंदील कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व विविध प्रकारचे आकाश कंदील तयार केले ,यामध्ये फक्त पर्यावरण पूरकच साहित्याचा वापर केला गेला. खूप छान प्रकारे कार्यशाळा संपन्न झाली .यासाठी विद्यालयातील कलाशिक्षक .श्री लोहार सर यांनी मार्गदर्शन केले त्याच प्रकारे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. जाधव यांनी मार्गदर्शन व पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले . स्कूल कमिटी सदस्य ,राजेंद्र गाढवे ,मोहन कासुर्डे ,सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.




