वाडे फाटा सातारा येथे शिवशाही बस पेटली
पुणे-बंगळुरू नॅशनल हायवेवर सातारा वाडेफाटा हद्दीत st महामंडळाच्या शिवशाही गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. यावेळी गाडीतून बरेच प्रवासी प्रवास करत होते. चालक – वाहकांने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बाहेर काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला
स्वारगेट-सांगली ही शिवशाही बस पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गवरून सांगलीकडे निघाली होती. ती दुपारी पावणेदोनच्या सुमारास साताऱ्यातील वाढेफाटा येथे आली असता गाडीतून धूर येऊ लागला. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून चालक-वाहकांना प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढले. तोपर्यंत गाडीने रौद्ररुप धारण केले होते. महामार्गावर आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. तर आसमंतात काळ्या धुराचे लोट उसळले होते. पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतुकीचे व्यवस्थित रित्या नियोजन केले. बसमधील प्रवाशांच्या साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत असून एस टी महामंडळ याबाबत काय करणार? असा सवाल जनतेतून होत आहे.
