Home » राज्य » शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली असून काँग्रेस सोडताना त्यांना वाईट वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली असून काँग्रेस सोडताना त्यांना वाईट वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

ब्रेकिंग! काँग्रेसला मोठा धक्का; रविंद्र धंगेकरांचा काँग्रेस सोडण्याचा निर्णय, शिवसेना शिंदे गटात होणार प्रवेश

 पुण्याचे काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी, मतदारांशी आणि समर्थकांशी सखोल चर्चा करून, त्यांनी आगामी राजकीय भविष्य निर्धारीत केलं आहे. शिंदे गटात प्रवेश करण्याबाबतच्या चर्चांना आता अंतिम रूप मिळालं आहे. धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली असून काँग्रेस सोडताना त्यांना वाईट वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

रविंद्र धंगेकर यांचा काँग्रेसमध्ये 10-12 वर्षांचा कार्यकाळ होता, आणि यामध्ये त्यांनी अनेक पातळ्यांवर काम केलं. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचे चर्चे सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी शिवसेनेचे शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी ‘कठीण निर्णय घेतला आहे, परंतु लोकांशी संपर्क साधला आणि सत्तेशिवाय काम करणं शक्य नाही’, असं सांगितलं.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

संत रोहिदास समाज फाऊंडेशनतर्फे ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा महाबळेश्वरमध्ये भव्य गौरव सोहळा संपन्न

Post Views: 14 संत रोहिदास समाज फाऊंडेशनतर्फे ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा महाबळेश्वरमध्ये भव्य गौरव सोहळा संपन्न महाबळेश्वर-सातारा आणि रायगड जिल्ह्यातील संत

Live Cricket