केळघरमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणणाऱ्या युवकांना अल्पोपहार व चहापान सोय शिवराय प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधीलकीचे कौतुक
केळघर, ता:१८:विविध गड -किल्ल्यावरून शिवजयंती दिवशी शिवज्योत आणल्या जातात. त्या शिव भक्तांच्या अल्पोपहार व चहापाणाची सोय शिवजन्मोत्सवानिमित्त येथील शिवराय प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आली आहे. शिवराय प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधीलकीचे कौतुक होत आहे.
शिवजयंती दिवशी युवक उत्साहाने विविध गड-किल्ल्यावरुन शिवज्योत दरवर्षी आणत असतात. गेल्या काही वर्षांपासून येथील शिवराय प्रतिष्ठान हे शिवज्योत आणणाऱ्या युवकांना अल्पोपहार व चहापान स्वयंस्फूर्तीने उपलब्ध करून देत असतात.आज संध्याकाळी सात ते उद्या गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे.
या उपक्रमासाठी अशोक बेलोशे व सागर सल्लक यांनी सहकार्य केले असून त्याचबरोबर माजी सरपंच रवींद्र सल्लक,थ्री. डी. ग्रुप,जगन्नाथ बेलोशे,किशोर इव्हेंट मॅनेजमेंट ,अक्षय आर्टस मेढा व ग्रामस्थ मंडळ केळघर यांनीही सहकार्य केले आहे.




