नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » Uncategorized » मतदारसंघासातील विकासपर्व अखंडित ठेवण्यासाठी मताधिक्य द्या आ.शिवेंद्रराजे

मतदारसंघासातील विकासपर्व अखंडित ठेवण्यासाठी मताधिक्य द्या आ.शिवेंद्रराजे

मतदारसंघासातील विकासपर्व अखंडित ठेवण्यासाठी मताधिक्य द्या आ.शिवेंद्रराजे

गोडोली व परिसरात पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )सातारा- जावली मतदारसंघात आजवर हजारो कोटींची विकासकामे मार्गी लावली आहेत. हद्दवाढ मंजूर करून त्रिशंकू भागाला विकासाच्या प्रवाहात आणले आहे. सातारा शहरासह हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागातील असंख्य विकासकामे प्रगतीपथावर आहेत. सातारा शहर, सातारा आणि जावली तालुक्यातील सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून यापुढेही मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवले जातील. मतदारसंघात सुरु असलेले विकासपर्व अखंडित ठेवण्यासाठी मला मताधिक्य देऊन विजयी करा, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. 

                 सातारा- जावली विधानसभेचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे यांच्या प्रचारार्थ गुरुवार सकाळी सातारा शहरातील एमजीपी कार्यालय, एसटी कॉलनी, फिनिक्स बंगला, अजिंक्य बाजार चौक, जगताप हॉस्पिटल, काळोखे वस्ती, मशीद, मारुती मंदिर, रणजित साळुंखे घर, माळी आळी, छ. अभयसिंहराजे भोसले कमान, हायवेने मस्केवाडा, जिजामाता उद्यान, बागड वस्ती, गोडोली चौक, जुनी शाळा, भैरवनाथ मंदिर, खामकर चौक, साई पतसंस्था, गोडोली जकात नाका अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी – माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. पदयात्रामार्गावर ठिकठकाणी माता- भगिनींनी शिवेंद्रराजेंचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. शिवेंद्रराजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला. 

              आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा शहर आणि सातारा जावलीतील जनतेचे आणि माझे अतूट असे नाते आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या विचारसरणीने माझे मार्गक्रमण सुरु आहे. जनतेचे प्रेम आणि साथीमुळेच मी मतदारसंघात विकासाचा झंजावात केला आहे. सर्व प्रकारच्या समस्या सोडवतानाच नागरिकांच्या मागणीनुसार विकासकामे मार्गी लावली आहेत. निवडणूक आली की, पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्रासारखे काही लोक उगवतात. पाच वर्ष कधीही न दिसणारे लोक निवडणूक आली कि मतदारसंघात घिरट्या घालू लागतात. अशा भूछत्रांना जनता कधीच भुलणार नाही, हे ‘त्यांना’ही माहिती आहे. माझा विजय निश्चित असून १ नंबरच्या मताधिक्याने मला विजयी करावे, असे आवाहन शिवेंद्रराजेंनी केले. 

               शुक्रवार दि. ८ रोजी सकाळी ७ वाजता मोना स्कुल, करी आप्पा चौक, लक्ष्मी टेकडी, लतीफभाई चौधरी घर, पोलीस चौकी, बाजारपेठ, आमणे बंगला, भीमाबाई आंबेडकर चौक अशी पदयात्रा, सायंकाळी ५ वाजता मार्केट यार्ड आणि सायंकाळी ७ वाजता रवी ढोणे कॉलनी, चिमणपुरा येथे कोपरा सभा होणार आहे. पदयात्रा व कोपरा सभांना सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket