Post Views: 8
विमानतळ येथील शिवाजी काॅलनीत बिबट्याचा वावर
कराड: विमानतळ मुंढे ता. कराड हद्दीतील शिवाजी काॅलनीत बिबट्याच दर्शन यामुळे लोकांच्यात भिती चे वातावरण आहे
कराड पाटण रस्त्यावरील शिवाजी काॅलनीतील सुनिल पवार यांच्या घराच्या पाठीमागे बाळू देसाई यांच्या ऊसातील शेतात एक मोठा व दोन लहान बिबट्याचे दर्शन प्रियांका पवार हीला झाले. गेल्या दहा दिवसांपासून येथे बिबट्याचा वावर आहे. शिवाजी काॅलनीतील अनेकांना दर्शन झाले आहे. येथील नागरिक भितीच्या वातावरणाखाली वावरत आहेत.
त्यामुळे शिवाजी काॅलनी परिसर बिबट्याच्या दहशतीतून केव्हा मुक्त होणार.वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी केली आहे.