Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शशिकांत कोचळे यांना बाल विकास समाज रत्न पुरस्कार प्रदान

शशिकांत कोचळे यांना बाल विकास समाज रत्न पुरस्कार प्रदान

शशिकांत कोचळे यांना बाल विकास समाज रत्न पुरस्कार प्रदान 

मुंबई :प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार सोहळा २०२४ हा कार्यक्रम मुंबई येथील बांद्रा येथील नॅशनल लायब्ररी येथे २५ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मा. श्री. पद्मश्री डॉ‌.जी.डी.यादव(राष्ट्रीय विज्ञान भारत सरकार)यांच्या हस्ते विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शशिकांत कोचळे सर यांना “बाल विकास समाज रत्न पुरस्कार २०२४” देऊन सन्मानित करण्यात आले. शशिकांत कोचळे सर हे विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी या संस्थेच्या माध्यमातून गेली ५ वर्ष सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत तसेच ह्या वर्षी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्वतः च्या जागेत एक मुलांचे वसतिगृह चालू केले आहे त्या वसतिगृहातील मुलांना शिक्षणासाठी हे कार्य करीत आहेत म्हणून त्यांना ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून या पुरस्कार सोहळ्यामध्ये डॉ.डेरिक एंजल्स (नासा शास्त्रज्ञ), डॉ.सुकृत खांडेकर (संपादक दैनिक प्रहार), डॉ.बाळासाहेब तोरस्कर (ज्येष्ठ साहित्यिक), डॉ.माळवे सर (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन समिती), प्रा.नागेश हुलवळे सर (व्हिजन संस्था मुंबई संस्थापक अध्यक्ष)तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले

Post Views: 15 बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले प्रतिनिधी -भाजपचे नेते बबनराव लोणीकरांवर

Live Cricket