Home » राज्य » शिक्षण » शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर,

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, 

प्रतिनिधी :महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२७ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये ९ जणांची उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.कोणाला कोठून मिळाली संधी?

वाशिममधील कारंजा-ज्ञायक पाटणी, हिंगणघाट-अतुल वांदिले, नागपूरमधील हिंगणा-रमेश बंग, अणुशक्तीनगर-फहद अहमद, चिंचवड-राहुल कलाटे, भोसरी-अजित गव्हाणे, माजलगाव-मोहन जगताप, परळी-राजेसाहेब देशमुख, मोहोळ-सिद्धी रमेश कदम यांच्यासह आदी जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत रहिमतपुर पोलीस ठाणे

Live Cricket