सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज निवृत्तीच्या राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या नेत्यांची अर्थातच पवारांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायकी नाही अशी जहरी टीका आ.महेश शिंदे नी केली आहे.
एकनाथ शिंदे गटाचे कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी आज सातारा येते झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जहरी टीका केली आहे. त्याचबरॊबर लोकसभेच्या सातारा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर चार हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप करत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे शशिकांत शिंदे यांना फरारी आरोपी म्हणत शरद पवारांनी फरारी आरोपीला साताऱ्याच्य महाविकास आघाडीची उमेदवारी देऊन यशवंत विचाराची चेष्टा केली असल्याचे देखील महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये नमूद केले.