दहावी पास उमेदवारांसाठी साता-यात आत्मनिर्भर अभ्यासक्रम
सातारा : आयुष हेल्थकेअर व सातारा डायग्नोस्टिक सेंटर यांच्या वतीने इयत्ता १० पास विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षात तीन पदविका अभ्यासक्रम सुरू होत आहेत. यामध्ये शिक्षण घेत नोकरी करून आत्मनिर्भर होण्याची संधी उमेदवारांना चालून आली आहे.
सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमसिंह शिंदे व आयुष हेल्थ केअरच्या संचालिका डॉ. पल्लवी दळवी यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की,
हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, जनरल ड्युटी असिस्टंट व आरोग्य कर्मचारी पदविका या तीन अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी ६० प्रवेश क्षमता मर्यादित आहे. एक वर्ष चालणा-या या अभ्यासक्रमात उमेदवाराला स्टायपेंड मिळू शकतो. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची या तिन्ही अभ्यासक्रमांना मान्यता आहे. शासकीय नोकरदार किंवा शिक्षण चालू असताना देखील एक्स्टर्नल अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.
आरोग्य कर्मचारी पदविका अभ्यासक्रमात शरिरशास्त्र आणि आहारशास्त्र, जनरल आणि स्पेशल नर्सिंग, निर्जंतुकीकरण, प्रथमोपचार, सामाजिक आरोग्य आणि आदरातिथ्य या विषयांचा समावेश आहे. जनरल ड्युटी असिस्टंट अभ्यासक्रमात शरिरशास्त्र आणि आहारशास्त्र, जनरल आणि स्पेशल नर्सिंग, निर्जंतुकीकरण, प्रथमोपचार, सामाजिक आरोग्य आणि आदरातिथ्य, मानवी शरीरासंबंधी माहिती, सामान्य रोग, नीतीशास्त्र संहिता नर्सिंग प्रॅक्टिस, हॉस्पिटल स्वच्छता, रुग्णालयातील साहित्याची ओळख, शिष्टाचार आणि संवाद कौशल्य आदींचा समावेश आहे.
हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर या कोर्स मध्ये अन्न आणि न्यूट्रिशन, वॉटर सॅनिटायझेशन, मानवी आरोग्य सुरक्षा, पर्यावरणीय स्वच्छता हे विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत आहेत. शासकीय, निमशसकीय किंवा खाजगी नोकरी मिळवण्यासाठी हा पॅरामेडिकल सेक्टर मधील अभ्यासक्रम उपयुक्त आहे. अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना सार्वजनिक आरोग्य क्षेत्र, हॉस्पिटल, रेल्वे, औद्योगिक प्रकल्प, विमानतळ, राज्य सरकार, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र हेल्थ पोस्टस, फार्मास्युटीकल क्षेत्र, तारांकित हॉटेल्स, फूड इंडस्ट्रीज, बंदरात व इतर क्षेत्रात नोकरीची संधी आहे. शिवाय येथे नोकरी साह्य प्लेसमेंट सुविधा गरजूंना सहाय्यभूत ठरू शकते. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी सातारा डायग्नोस्टिक सेंटर, देवी कॉलनी सातारा अथवा ७२४९१९००९९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.