वाई शेती उत्पन्न बाजार समिती नवीन हळद आवक सुरू उंच्चाकी दर रू.१६१००/- वाई तालुक्यातील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी महाराष्ट्र राज्याचे लाङके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या ऊत्साहात साजरा सरदार वल्लभाई हायस्कूल साखरवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील मैत्रीला 23 वर्षानंतर उजाळा ९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न सायबर गुन्ह्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तर द्यावे लागेल’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » भुईंज येथील वीर जीवा महाले नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी वैभव पवार,कार्याध्यक्ष पदी शिवराज खरे उपाध्यक्ष पदी धनंजय खरे यांची निवड

भुईंज येथील वीर जीवा महाले नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी वैभव पवार,कार्याध्यक्ष पदी शिवराज खरे उपाध्यक्ष पदी धनंजय खरे यांची निवड

भुईंज येथील वीर जीवा महाले नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी वैभव पवार,कार्याध्यक्ष पदी शिवराज खरे उपाध्यक्ष पदी धनंजय खरे यांची निवड

भुईंज ता.वाई येथील सन्मित्र कला वैभव मंडळ आणि वीर जीवा महाले नाभिक संघटना यांच्या अध्यक्षपदी वैभव पवार,कार्याध्यक्ष पदी शिवराज खरे,उपाध्यक्ष पदी धनंजय खरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.भुईंज ता.वाई येथील सन्मित्र कला वैभव मंडळ आणि वीर जीवा महाले नाभिक संघटना भुईंज या दोन्ही संघटनांची वार्षिक मीटिंग पत्रकार,अभिनेते मधुकर खरे यांच्या अध्यक्षतेखाली भुईंज ता.वाई येथील नाभिक समाजाच्या सभागृहात पार पडली.

या मीटिंग मध्ये पुढील वर्षभरासाठी भुईंज येथील सन्मित्र कला वैभव मंडळ,भुईंज वीर जीवा महाले नाभिक संघटनेच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.या कार्यकारिणी मध्ये वैभव पवार यांची अध्यक्षपदी शिवराज खरे यांची कार्याध्यक्ष पदी,धनंजय खरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.या प्रसंगी सन्मित्र कला वैभव मंडळ आणि वीर जीवा महाले नाभिक संघटनेच्या खजिनदार पदी कुणालखरे,सचिव पदी अनुराग खरे सह सचिव पदी अथर्व खरे तर संचालक म्हणून आदर्श खरे विनायक खरे,धनंजय खरे,सोपान खरे,साई खरे,सुमित खरे,सल्लागार समिती मध्ये जीवा सेना संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार खरे, प्रशांत खरे,शिवाजी पवार,चेतन खरे यांची बिनविरोध निवड निवड करण्यात आली.

या प्रसंगी पुढील वर्षात श्री संत सेना महाराज मूर्ती प्रतिष्ठापना,श्री संत सेना महाराज समाज मंदिराची वास्तुशांती समारंभ,समाज मंदिरांच्या वरच्या मजल्याचे बांधकाम,जिवा महाले जयंती उत्सव या सर्व जबाबदाऱ्या नवीन कार्यकारिणी वर सोपविण्यात आल्या असून नवीन कार्यकारिणी पुढील एका वर्षात संत सेना महाराज मंदिरात,श्री संत सेना महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना करून,श्री संत सेना महाराज सभागृहाच्या वरच्या मजल्याच्या बांधकामाला मंजुरी मिळऊन,बांधकाम पूर्ण करून घेणार आहे.याशिवाय वीर जीवा महाले जयंती उत्सव सोहळ्याचे नियोजक करून हा सोहळा दिमाखदार स्वरूपात साजरा करणार असल्याचा निर्धार अध्यक्ष वैभव पवार,कार्याध्यक्ष शिवराज खरे आणि नवीन कार्यकारिणीने केला.

सन्मित्र कला वैभव मंडळ आणि वीर जीवा महाले नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार पत्रकार,अभिनेते मधुकर खरे,सचिन खरे,जीवा सेना संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार खरे,आनंद खरे,गणेश खरे,शिवाजी पवार यांचे हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी भुईंज येथील नाभिक समाजातील सर्व सदस्य,पदाधिकारी, समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

९०वां व्यवसाय प्रारंभ-दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महाकर्ज मेळावा पाचवड येथे संपन्न

Live Cricket