सातारा जिल्हा खाद्य व्यावसायिक विभाग उपाध्यक्षपदी उद्योजक सागर भोसले यांची निवड
सातारा प्रतिनिधी -फूड अँड ड्रग्स कंजूमर वेल्फेअर कमिटी म्हणजे खाद्य व औषधे याच्याशी संलग्न असणारे ग्राहक म्हणजेच जवळजवळ सर्वच नागरिक यांची राष्ट्रीय पातळीवरील एक संघटना
या संघटनेच्या माध्यमातून ग्राहकांचे हित जपण्यासाठी या व्यवसायाशी संलग्न असणाऱ्या सर्व व्यवसायिकांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणे व ग्राहक हित जपण्यासाठी उद्युक्त करणे यासाठी विविध मार्गदर्शनपर शिबिरे घेणे, प्रशिक्षण घेणे सर्व शासकीय नियमांची माहिती करून देणे या व्यवसायातील चुकीच्या पद्धतीने चाप लावणे हा उद्देश या संघटनेचा आहे व त्यासाठी सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सागर भोसले यांची निवड करण्यात आली.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर मोरे यांनी सागर भोसले वर जबाबदारी दिली आली आहे.
सागर भोसले यांनी जबाबदारी स्वीकारून संघटनेमध्ये ग्राहकांचे हित जोपासण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सागर भोसले यांनी सामाजिक कार्यामध्ये तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे.