शाळा संस्कारपीठ असते- ॲड सीमंतिनी नुलकर लोकमंगल हायस्कूल येथे विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
सातारा . ता .10 शालेय जीवनात लहान मुलांना शाळेतून संस्काराचे धडे दिले जातात त्यामुळे शाळा ही संस्कारपिठ असते असे प्रतिपादन ॲड सीमंतिनी नुलकर यांनी केले .
सातारा औद्योगिक वसाहती मधील लोकमंगल हायस्कूल येथे गणेशोत्सव कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोक मंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, अनिल वाळिंबे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या बाबर, संचालक सतीश पवार, ज्येष्ठ शिक्षक विजय यादव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .
नूलकर पुढे म्हणाल्या शालेय जीवनात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करता आली पाहिजे. या विद्यालयात वाचनाची आवड विद्यार्थ्यांना असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे. शालेय जीवनात मिळालेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे. या शाळेला मोठे ग्राउंड आहे. या ग्राउंडचा वापर करून आपण विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे.
शिरीष चिटणीस म्हणाले या शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात जसे की कलचाचणी सारखे उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी पडू शकतो. कला, क्रीडा, भाषा विषयांच्या स्पर्धेत येथील विद्यार्थी सहभाग घेतात. विविध शालेय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घेतल्यामुळे पुढे त्याचा उपयोग होत असतो. विद्यार्थ्यांनी नेहमी संधीचे सोने करता आले पाहिजे. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग आवश्यक आहे. या शाळेतील विद्यार्थी एकांकिका स्पर्धेत सहभाग घेतात. त्यांच्यामध्ये असणारी धाडसी वृत्ती दिसून येते. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घेतला ते विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी ठरले आहेत.
यावेळी गणेशोत्सव कालावधीमध्ये रांगोळी, चित्रकला, पाककला, मेहंदी, या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास बाळकृष्ण इंगळे, गुलाब पठाण, देवराम राऊत, चंद्रकांत देवगड, विजय गव्हाळे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली वाडीले यांनी केले. उपस्थिताचे आभार विजय यादव यांनी मानले.
