सातारा हॉस्पिटल, सातारा डायग्नोस्टिक सेंटर, माधवबाग यांचे संयुक्त विदयमाने आयोजित मोफत तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा प्रतिनिधी -सातारा हॉस्पिटल, सातारा डायग्नोस्टिक सेंटर, माधवबाग यांचे संयुक्त विदयमाने आयोजित मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले, यावेळी ज्येष्ठ नागरिकांना निरामय निरोगी जीवन जगण्यासाठी, राज्यस्तरीय चेतना जागृती पुरस्कार प्राप्त श्री संजय घोरपडे यांचे मोबाईलचा गैरवापर टाळून सुखी, आनंदी आरोग्य कसे ठेवता येते याविषयीचे माहिती पूर्ण व्याख्यान एट युवर सर्व्हिस & कॉन्ट्रॅक्ट यांचे तर्फे आयोजित करण्यात आले यावेळी उपस्थित कृतिशील निवृत अधिकारी कर्मचारी संस्थेच्या सभासद यांच्या रक्त शर्करा तपासणी, रक्त दाब, शरीरातील ऑक्सीजन लेव्हल, वजन, जनरल चेकअप, मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी हॉस्पिटल व्यवस्थापन यांनी आयोजित केलेल्या तपासणी शिबिर व मार्गदर्शन याबद्दल डॉ प्रा चंद्रकांत नलावडे यांनी डॉ.सुरेश शिंदे सर, डॉ. जयश्री शिंदे, सी ई ओ श्री विक्रम शिंदे, माधव बाग क्लिनिक हेड डॉ.देवकी पळनिटकर व स्टाफ,व्याख्याते श्री संजय घोरपडे , मॅनेजर पब्लिक रिलेशन श्रीकांत देशमुख यांचे आभार मानले..
