Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा नोकर भरती प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा दिनांक ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजन.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा नोकर भरती प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा दिनांक ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजन.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा नोकर भरती प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा दिनांक ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजन.

सातारा :सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा या बँकेतील कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या रिक्त पदांच्या भरतीसाठी वृत्तपत्रात आणि बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आलेल्या जाहिरातीस अनुसरून कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. यानंतर ऑनलाईन अर्जामधील माहितीच्या आधारावर पात्र उमेदवारांची यादी दिनांक १८-०९-२०२४ रोजी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ ते सोमवार दिनांक ९ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये सातारा व पुणे या शहरांमधील खालील ठिकाणी घेतली जाणार आहे.

१. यशोदा टेक्नीकल कॅम्पस, सातारा, एनएच-४, सर्वे नं. २४२/१, व्हीएन आरडी., वाढे, 

           सातारा, महाराष्ट्र ४१५०१५.  

२. नोवा कन्सलटन्सी सर्विसेस, पुणे-सातारा रोड, ललवाणी मदर अॅंड चाईल्ड केअर हॉस्पिटल समोर, वसंत बाग सोसायटी, बिबवेवाडी, पुणे-४११०३७.

३. ट्रिनीटी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अॅंड रिसर्च, सासवड-बोपदेव-पुणे रोड, येवलेवाडी, कोंढवा  

           बुद्रुक, पुणे-४११०४८

४. एमआयटी आर्ट, डिझाईन अॅंड टेक्नोलॉजी युनिवर्सिटी, राजबाग लोणी काळभोर, सोलापूर हायवे, भारत पेट्रोल पंपाजवळ, लोणी काळभोर रेल्वे स्टेशन, पुणे – ४१२२०१ 

५. जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अॅंड मॅनेजमेंट, नविन गेट नंबर १२००, डोमखेल रोड, वाघोली, पुणे – ४१२२०७    

  कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदांसाठी वर नमूद तारखांना सकाळी १०.०० ते ११.३०, दुपारी १.०० ते २.३० व दुपारी ४.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी www.sataradccb.in व www.sataradccb.com या संकेतस्थळावर शनिवार दिनांक ३०-११-२०२४ पासून प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उपलब्ध केले जाणार आहे. बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या पात्र उमेदवारांच्या यादीमधील उमेदवारांनी वर नमूद संकेतस्थळावरून प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून घ्यावे.

 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेस येताना फक्त ओरिजिनल प्रवेश पत्र (हॉल तिकीट), पेन, ओरिजिनल ओळख पत्र, (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, मतदान कार्ड) बरोबर घेऊन यावे. याशिवाय कोणतीही वस्तू परीक्षा केंद्रामध्ये घेऊन जाता येणार नाही. (उदा. कॅलक्युलेटर, स्मार्टवॉच, इलेक्ट्रोनिक घड्याळ, ब्लूटूथ, मोबाईल फोन, पेजर अथवा अन्य साहित्य व इतर कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे). महिलांच्या नावात बदल असलेस विवाह नोंदणी प्रमाणपत्र / राजपत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक राहील.

 उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेपूर्वी २ तास आधी उपस्थित राहणेचे आहे. परीक्षा सुरु झालेनंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी प्रवेश पत्रावरील (हॉल तिकीट) सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. उमेदवारांशिवाय इतर कोणालाही परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.तरी, वरील सर्व सूचनांची नोंद उमेदवारांनी घ्यावी, असे आवाहन बँकेमार्फत करणेत आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket