सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव
प्रतिनिधी -सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवात रविवार दि १२ रोजी सकाळी साडे आठ वाजता दरवर्षीप्रमाणे मुलांच्या गुणांचे संवर्धन करणारा शालेय विद्यार्थ्यांचा आनंददायी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे .दर वर्षी यात मुलांचा भरपूर सहभाग असतो .या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी प्राथमिक च्या शबनम मुजावर यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्राचार्या आझाद कॉलेज डॉ वंदना नलावडे , तुषार पाटील , सौ अनघा कारखानीस , संजय जाधव उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे संवादक राजकुमार निकम आहेत .दुपारी अडीच वाजता सध्या गाजत असलेल्या व बऱ्याच भाषेत अनुवादित आणि पुरस्कार प्राप्त नदिष्ट कादंबरीचे लेखक मनोज बोरगावकर यांची प्रकट मुलाखत सौ सुनिताराजे पवार व श्री शिरीष चिटणीस घेणार आहेत .दुपारी चार वाजता आपली मराठी अभिजात झाली , आता वाटचाल कशी होणार ? अपेक्षांची पूर्ती होणार का ?या विषयावर परिसंवाद होणार आहे याचे अध्यक्षस्थान विनोद कुलकर्णी भूषवणार आहेत तर यात सहभागी वक्ते म्हणून हरिष पाटणे , श्रीकांत कात्रे , दीपक शिंदे उपस्थित राहणार आहेत .या वेळी उपायुक्त मराठी राजभाषा महाराष्ट्र शासन च्या अंजली ढमाळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत . या परिसंवादाचे सुत्रसंचालन मुकुंद फडके करणार आहेत .सायंकाळी सात वाजता सातारच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदे यांची प्रकट मुलाखत प्रदीप कांबळे घेणार आहेत . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध पटकथाकार प्रताप गंगावणे उपस्थित राहणार आहेत .
महेश सोनवणे पूनम कापसे व वनराज कुमकर सादरीकरण करणार आहेत .देवमाणूस मध्ये सरुआज्जी ची भूमिका करणाऱ्या रुक्मिणी सुतार व पारू मालिकेतील श्वेता खरात यांचाही सहभाग असणार आहे .प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ शिवलींग मेनकुदळे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यवाह शिरीष चिटणीस व ग्रंथमहोत्सवाच समितीचे अध्यक्ष डॉ यशवंत पाटणे यांनी केली आहे .