साता-यात लाडू चिवडा महोत्सव २०२४ सुरु
व्यापारी सहकारी पतसंस्थेचा सामाजिक बांधिलकीतून “ना नफा ना तोटा तत्वावर उपक्रमाचे २० वे वर्ष
सातारा प्रतिनिधी :सातारा शहराची अर्थवाहिनी असलेली व्यापारी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा ही सभासदांच्या अर्थविषयक गरजा भागवीत असतानाच विविध सामाजिक उपक्रम राबवीत असते. संस्थेचे सभासद, ग्राहक आणि सातारकरांची दिवाळी गोड व्हावी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुप्रसाद सारडा यांच्या संकल्पनेतून २० व्या वर्षीही ना नफा ना तोटा” या तत्वावर लाडू चिवडा महोत्सवाचे उद्घादन शनिवार दिनांक २६/१०/२०२४ रोजी संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके यांचे हस्ते झाले.
पतसंस्थेच्या वतीने गेली १९ वर्षे हा महोत्सव आयोजित केला जातो, त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. लाडू व चिवडा तयार करण्यासाठी बेसन, तेल, साखर, शेंगदाणे, पोहे, चुरमुरे दर्जेदार वापरले जातात, याबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही असे संस्थेचे चेअरमन श्री. पिलके यांनी म्हटले.
यंदाचा २० वा लाडू चिवडा महोत्सव मंगळवार दिनांक २६/१०/२०२४ ते ०३/११/२०२४ या नऊ दिवसाचे कालावधीमध्ये साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी मजुरी, इंधन, लागणारा कच्चा माल यामध्ये अधिक वाढ झाली आहे, असे असताना चिवडा केवळ रु. १८०/- व लाडू रु. १८०/- प्रती किलो या दराने उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सदर लाडू चिवडा विक्रीची संपूर्ण व्यवस्था श्री. प्रभाकर राऊत मिठाईवाले, मल्हार पेठ, सातारा येथे केली आहे. तरी या उपक्रमास सातारकरांनी ज्यास्तीत ज्यास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन चेअरमन श्री. दिलीप पिलके यांनी केले आहे.
या महोत्सवाच्या शुभारंभवेळी संस्थेचे चेअरमन श्री. दिलीप पिलके, व्हा. चेअरमन श्री. शिवप्रसाद मिणीयार, श्री. भरतशेठ राऊत, श्री. प्रकाशशेठ गवळी, श्री. गोवर्धन सारडा, संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.