संगीता माने ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहिल्या : प्राचार्य डॉ.सुनील कुमार लवटे
सातारा दि.29 (प्रतिनिधी)भारतीय स्त्री संगीता माने ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्रवाहाच्या विरुद्ध पोहत उभ्या राहिल्या असे प्रतिपादन प्राचार्य डॉ .सुनीलकुमार लवटे यांनी दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित कवयित्री संगीता अजित माने यांची पोलीस सब इन्स्पेक्टर पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले .
सदर कार्यक्रमास विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस, संगीता माने ,व्यवस्थापक विनायक भोसले मान्यवर उपस्थित होते. यापुढे बोलताना प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे म्हणाले त्या नुसत्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या नसून प्रतिकूल परिस्थितीशी लढून नाकावर टिचून उभ्या राहिल्या आहेत.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरा निवडण्याचे स्वातंत्र्य तिला मिळाले असून अजित माने यांच्यासारखा शांत संयमी, व्यक्ती पतीच्या रूपाने मिळाले आहेत.संगीता माने यांना नवरा लाभलेला आहे नवरा लाभलेला असणं म्हणजे एखाद्या स्त्रीला किती शहाणा नवरा मिळणे हे होय यावेळी अजित माने यांनी संगीता माने यांच्या बद्दल जे काही विचार मांडले ते विचार भारतातील सर्व नवऱ्याने ऐकले असता पुरुष क्रांतीचे युग येईल असे म्हणाले.
संगीताच्या माने यांनी त्यांच्या भाषणामध्ये समाजामध्ये नोकरी करताना आपल्या सर्व मातृत्वाच्या भावना बाजूला ठेवून काम करावे लागते. मनुष्याला हेच जीवन असेच पचवत आयुष्याला सामोरे जावे लागते.
इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कविता जिवंत ठेवणे ही फार अवघड गोष्ट आहे कविता जन्माला येते ती खरी आहे पण ती वेदनेचे कुस आणि वेदनेचे खुश घेऊन येत असते.संगीता माने यांनी आपल्या कविता द्वारे समाज जिवंत ठेवण्याचे कार्य केले आहे.इतर सामान्य माणसांना खाल्लेले अन्न जिवंत ठेवते परंतु संगीता माने यांना त्यांच्या कविता जिवंत ठेवतात कविता हे त्यांच्या जीवनाचे टॉनिक आहे.माणसाला जगायला साधन लागते एक सपोर्ट लागतो एकदा माणसाला कशासाठी जगायचे याचा शोध लागला की तो त्या ध्येयाने प्रेरित होऊन जीवनक्रम व्यतीत करतो.
पोलीस व्यवसायाशी संबंधित असणारे व्यक्ती अशा कणखरच असून फार सक्षम असतात। जशास तसे अशी भूमिका घेतल्यामुळे पोलीस खात्यात निभाव लागू शकतो पोलीस क्षेत्रात रडणारी माणसे टिकत नाही ..
त्या ज्या प्रमाणे नोकरी क्षेत्रामध्ये प्रामाणिक काम करतात त्याचप्रमाणे त्यांना साहित्याची रुची असल्यामुळे त्या वेगवेगळ्या साहित्यिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतात .शिरीष चिटणीस म्हणाले संगीता माने यांनी अतिशय कष्टाने पोलीस भरतीमध्ये यश मिळवले आज मीतीस त्यांची 34 वर्षे झाली असून प्रमोशन घेत घेत त्या इथपर्यंत पोहोचले आहेत . त्या अतिशय सवेदीपशील व्यक्तिमत्व आहेत.त्यांचे नुकतेच मुंबई येथे पीएसआय पदी प्रमोशन झाले असून ही त्यांच्या कष्टाची, प्रामाणिक पानाची पोहोच पावती आहे. त्यांची साहित्यामध्ये आवड असून विशेषतः कविता, लावणी, अभंग चारोळी मध्ये त्या आघाडीवर आहेत. यावेळी दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यासपीठ हे प्रतिभावंतांसाठी असून तुमच्यातील प्रतिभेला न्याय देणारे हक्काचे व्यासपीठ आहे असे म्हणाले.
यावेळी सुनील कुमार लवटे यांच्या यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले लवटे सर हे अतिशय नम्र व्यक्तिमत्व असून अतिशय खडतर परिस्थितीतून वर आले आहेत. ते वि स खांडेकर यांच्या बरोबर शाळेत शिकायला होते. खांडेकर नेहमी कवी साहित्यिक यांना आपल्या शाळेवर घेऊन जायचे व त्यांचे विचार विद्यार्थ्यांना ऐकवायचे. त्यामुळे त्यांच्या विचाराचा पगडा लवटे सरांच्या वर आहे. लवटे सरांनी अनेक अनेक मराठी पुस्तके हिंदीमध्ये लिहिली असून त्यांना हिंदी भाषिक चा पुरस्कार मिळाला आहे.विनोद कुलकर्णी म्हणाले सुनिता माने यांची गेली चार ते पाच वर्ष साहित्यामधील कार्य बघत असून त्यांना साहित्य क्षेत्रात काहीतरी नवनिर्मिती करायची भावना आहे. आणि त्या भावनेतूनच त्या कविता लिहितात कधी प्रसंगा मधून ताबडतोब लेखणी चालते यातून चांगले शब्द बाहेर पडतात पोलीस खात्यामध्ये काम करत असताना त्यांनी कित्येक कष्ट वेदना या भोगलेल्या आहेत मी पाहिलेल्या आहेत. दैनंदिन काम करत असताना बरेच प्रेशर असते क्षणार्धात कोणताही आदेश येईल कोणती कार्य करायला लागेल याची खात्री नसते किती तासाची ड्युटी असते याची सुद्धा खात्री नसते तेव्हा कुटुंब सांभाळायचे नोकरी करायची हे प्रचंड आव्हानात्मक काम आणि पोलीस महिलांना करावे लागते. व त्यातून कविता सारखे साहित्य सुचणे फार अवघड गोष्ट असते अशा परिस्थितीत सुद्धा साहित्य सुचते हे महत्त्वपूर्ण आहे.
सुनिता माने यांचे साहित्यिक काम हे खूप चांगले असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कविता प्रोग्रामला हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे अनेक कविता करणाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे
सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता, गाणी, विचार फेसबुक किंवा व्हाट्सअप वर आपण टाकत असतो त्यामुळे अनेक नवोदित कविताकारांना उपयोग होतो अशा पैकीच संगीता माने एक आहेत. त्यांनी पोलीस खात्यामध्ये चांगली सेवा बजावली असल्यामुळे त्यांना मुंबई येथे पीएसआय पदावर पदोन्नती मिळाली आहे हे त्यांच्या कष्टाचे प्रतीक आहे.
सत्काराला उत्तर देताना संगीता माने म्हणाल्या मला स्वप्नातही वाटत नव्हते की माझा असा सत्कार शिरीष चिटणीस सरांमुळे होईल त्याकरता प्रथमता त्यांनी मनापासून आभार मानले. यानंतर त्या म्हणाल्या आमच्या संसाराला 35 वर्षे झाली असून माझ्या पतीने माझ्या सत्कार प्रसंगी केलेले हे कौतुक माझ्यासाठी महत्त्वाची बाब आहे. माझ्या प्रगतीमध्ये माझे पती कधीही बाधा झाले नाहीत या उलट त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला.पोलीस खात्यामध्ये माझी 33 वर्षे सर्वे झाली असून नोकरी फक्त प्रामाणिकपणाने केली आई पोलीस असल्यामुळे आमच्या मला पोलिसाचे वातावरण नवीन नव्हते ते माझ्यासाठी बाळकडूच होते.
मी माझ्या सर्विस मध्ये तीन महिन्याचे बाळ घरामध्ये ठेवून काम केले असे .पोलिसाची ड्युटी करताना भावनांना बाजूला ठेवावे लागत असे. त्यात माझे पती पोलीस मध्ये असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी आल्या.
त्या सर्व अडचणींना तोंड देत आज मी पीएसआय पदी मुंबई येथे पदोन्नती झाली आहे. ही आमच्या फॅमिली साठी भूषणावर आहे.
पोलिसाचे काम करत असताना सुद्धा माझे साहित्यिक कामकाज चालू होतेच त्यातूनच मी जवळपास चार ते पाच हजार कविता केल्या आहेत. कविता हे माझे टॉनिक असून जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
यावेळी लवटे सरांच्या बद्दल बोलताना त्या म्हणाल्या लवटे सरांचे साहित्य आपण वाचले पाहिजे सरांना आपल्या साहित्यापेक्षा दुसऱ्याचे साहित्य वाचायला खूप आवडते. त्यांच्या हस्ते झालेल्या माझा हा सत्कार माझ्या पुढील वाटचालीस प्रेरणादायक आहे.
अजित माने म्हणाले माझ्या पत्नीचा पोलीस क्षेत्रामध्ये पदोन्नती झाल्याबद्दल शिरीष चिटणीस साहेबांनी सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो खरे सांगायचे झाले तर 2013 सालीच सदरचे प्रमोशन मिळायला हवे होते परंतु ते आज उद्या करता करता आज मिळाले आहे.
सुरुवातीच्या नोकरीच्या काळात आम्ही दोघेही पोलीस मध्ये नोकरीला असल्यामुळे काही माणसांनी मला वेड्यात काढले. तीच माणसे आज मला तुझा निर्णय योग्य होता असे म्हणत आहेत.
दैनंदिन जीवनात आपण काम करत असताना मला एक वेळ जेवण दिली नाही तरी चालेल पण काम मात्र वेळेत पूर्ण करण्याकडे कल असतो. मी माझ्या पत्नीला कधी घरच्या कामाबद्दल न विचारता तू तुझ्या करिअर कडे लक्ष दे तर कधी घरगुती काम करून सपोर्ट केला ती एक धाडसी व्यक्तिमत्व असून ते कामामध्ये प्रामाणिक असून सुद्धा साहित्य क्षेत्रामध्ये विविध उपक्रम घेऊन आपले नाव करत आहेत , दोन मुले शिकत असताना संसार करून मला नेहमी आर्थिक साथ दिली.तसेच साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या नावाचा ठसा उठवण्याचा प्रयत्न केला आहे सदर कार्यक्रम प्रसंगाच्या शेवटच्या क्षणी संगीता माने यांच्या संबंध असणाऱ्या काही निवडक माणसांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.