सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतही सह्याद्रीचे सभासद विद्यमान चेअरमनना माजी चेअरमन करणारच-आ.मनोजदादा घोरपडे
मसूर :कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात 2019 नंतर परिवर्तनाला खरी सुरुवात झाली. बाजार समितीमध्ये राबवलेला पॅटर्न यशस्वी झाला आणि सत्ता अबाधित राहिली. लोकसभेलाही अपेक्षित असे परिवर्तन घडले. त्यानंतर विधानसभा निवडणूक लागली. विधानसभेला तर 35 वर्षाची एकाच घरातील सत्ता बदल होऊन जनतेने ऐतिहासिक परिवर्तन केले. त्यामुळे होऊ घातलेल्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतही शंभर टक्के परिवर्तन होणारच असा निर्धार व्यक्त करत कराड उत्तरच्या जनतेने जसे त्यांना माजी आमदार केले तसे सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतही सह्याद्रीचे सभासद विद्यमान चेअरमनना माजी चेअरमन करणारच असा विश्वास आ.मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केला.
गोसावेवाडी ता.कराड येथे ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या धनगरवाडी योजनेच्या पाण्याचे जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक शिवाजी जगदाळे होते. यावेळी महानंदाचे संचालक वसंतराव जगदाळे, कोयना दूध संघाचे संचालक संपतराव इंगवले कराड उत्तरचे युवा नेते कुलदीप क्षिरसागर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड, रणजीत कदम, उमेश चव्हाण, उपसरपंच संतोष शिंदे, बाळासाहेब जाधव, रवींद्र सूर्यवंशी, किसन पाटील, संदीप जगदाळे, शिवाजी जगदाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार घोरपडे पुढे म्हणाले, मतदारसंघात काम करताना मला गावातील मतांची लिस्ट बघून काम करण्याची गरजच नाही. प्रत्येक गावानेच मला भरघोस प्रेम दिले आहे. यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी केवळ आडवा आडवी जिरवा जिरवी याशिवाय दुसरा धंदा केला नाही. मात्र जनतेने त्यांची आमदारकीची कवच कुंडले काढून घेतली आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत बापलेकांचा एकाच वेळी सह्याद्रीचे सभासद करेक्ट कार्यक्रम करणार आहेत. लोकाभिमुख प्रशासन राबवून जनतेची कामे करून विकासाच्या दिशेन मतदारसंघ घेऊन जाताना पुढील दोन वर्षातच मतदारसंघाचे नंदनवन करू अशी ग्वाही दिली.
कुलदीप क्षीरसागर म्हणाले कराड उत्तर मतदारसंघात नियतीने बदल घडवून आणला आहे. त्यामुळेच कल्पक दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या हस्ते आज पाणी पूजन झाले आहे. जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मनोज घोरपडे कराड उत्तर मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉग नक्कीच भरून काढतील असा विश्वास व्यक्त केला
प्रमोद गायकवाड म्हणाले जनतेने विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना माजी आमदार केले आहे. त्यामुळे सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतही विधानसभेप्रमाणेच साथ देत विद्यमान चेअरमनना माजी चेअरमन करावे असे आवाहन केले.लालासो शिंदे यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच संतोष शिंदे यांनी स्वागत केले. हणमंत जाधव यांनी आभार मानले.
कार्यक्रमास मारुती घोलप, प्रशांत घोलप, बाळासाहेब कांबीरे, कृष्णत शिंदे, संजय पवार, वैभव इंगळे, श्रीकांत पाटील, संभाजी पाटील, अमर पाटील, अशोक जाधव, विकास निकम ,नितीन पवार, नितीन जाधव अभिजीत पवार, सागर शिंदे, सुमित गोसावी ,अजित पवार, विशाल घाडगे, अजित जाधव आधीसह परिसरातील विविध गावातील मान्यवर ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
स्वाभिमानी सखी मंच सदैव महिलांच्या पाठीशी… कराड उत्तर मतदार संघात स्वाभिमानी सखी मंचच्या माध्यमातून सुमारे 40 हजार महिला संघटित झाल्या आहेत. त्यांची बचत गटाची कामे असोत किंवा विविध समस्या असोत त्या सोडवण्यासाठी स्वाभिमानी सखी मंच महिलांच्या सदैव पाठीशी राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनही लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक सक्षम करण्याबरोबरच आत्मसन्मान वाढवण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
