‘साधना’ च्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेमध्ये यश
जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये साधना इंग्लिश मीडियम स्कूल चा विद्यार्थी वंश डफळ याची विभागीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जडणघडणीमध्ये कराटे सारख्या क्रीडा प्रकार देखील अत्यंत महत्त्वाचा असतो. बाजारपेठेतील इतक्या तंत्रज्ञानामुळे मुलांना स्क्रीनपासून दूर नेणे आणि त्यांना क्रीडा प्रकारा मध्ये मध्ये गुंतवणे कठीण होऊ शकते. मुलांसाठी स्वतःला अभिव्यक्त करण्याचा, त्यांची कौशल्ये विकसित करण्याचा, आराम करण्याचा आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह दर्जेदार वेळेचा आनंद घेण्याचा हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. आजच्या व्यस्त जगात खेळायांना आणि आरोग्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर नेहमीच लक्ष केंद्रित केले जाते. साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या या विद्यार्थ्यांचे यशाबद्दल यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे ,शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली धुमाळे यांनी शुभेच्छा दिल्या , क्रीडाशिक्षक गणेश खैरमोडे व मंथन पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.