रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांचा सर्वसामान्य जनतेसाठी अभिनव उपक्रम !
सातारा :गेली पाच दशके रुबी हॉल विविध माध्यमातून रुग्णांची अव्याहतपणे सेवा करत आहे. एमआरआय/सीटी स्कॅन यासारख्या सुविधा प्रथमतः रुबी हॉलनेच दिल्या. महाराष्ट्रातील अनेक शहर व ग्रामीण भागात अत्याधुनिक एमआरआय/सीटी स्कॅन सेंटर्स सुरु करण्यात आली आहेत. ही सेंटर्स रुग्णांना नव संजीवनी ठरली आहेत. रुबी नेहमीच काळाच्या एक पाउल पुढे रहात आली आहे. रुग्णांचे हित कायम लक्षात ठेवून वाटचाल करणाऱ्या सेवाभावी रुबी हॉल क्लिनिक एक अभिनव उपक्रम राबवत आहे. आम जनतेच्या सोयी व सुविधेसाठी आणि गरजू रुग्णांसाठी अतिशय अल्प दरात कोणताही एमआरआय रु. ४०००/- मध्ये तपासणीची संधी रुबी हॉल, सातारा येथे प्राप्त करुन दिली आहे.
उच्च दर्जाची निदान पद्धती असलेल्या एमआरआय ३ टेस्लावर आपले एमआरआय करुन घ्यावे. जेणे करुन आपले निदान योग्य आणि अचूक होईल व आपल्या डॉक्टरांना उपचार करणे सुलभ आणि सोयीचे होईल. तरी या सुवर्णसंधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकचे असिस्टंट जनरल मॅनेजर डॉ. संजय लावंड यांनी केले आहे.