Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » रोबोटिक अँड स्टेम लॅबचा उद्या नामदार महेश शिंदे करणार शुभारंभ

रोबोटिक अँड स्टेम लॅबचा उद्या नामदार महेश शिंदे करणार शुभारंभ

रोबोटिक अँड स्टेम लॅबचा उद्या नामदार महेश शिंदे करणार शुभारंभ

गौरीशंकर च्या सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल खटाव मधील विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिकतेचे नवे शिक्षण

सातारा -सातारा जिल्ह्यात प्रथमच खटाव येथे रोबोटिक अँड स्टेम लॅब ची निर्मिती.. खटाव.. शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत प्रगल्भ असणाऱ्या खटाव मधील गौरीशंकर चे सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आता विद्यार्थ्यांना आधुनिकतेचे शिक्षण मिळणार आहे रोबोटिक या तंत्रज्ञानावर आधारित सुसज्ज लॅबची निर्मिती केली असून शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी अकरा वाजता नामदार महेश दादा शिंदे व डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते या लॅब चा शुभारंभ होणार आहे आधुनिकतेचे शिक्षणाची कास धरून वाटचाल करणाऱ्या सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल ने आज पर्यंत असंख्य विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्नतेने घडवले आहे या पुढील काळात विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी आधुनिक  

तंत्रज्ञानाची अत्यंत गरज आहे आणि त्याच दृष्टीने या स्कूलने पावले उचललेले आहेत रोबोटिक अँड स्टेम लॅबमुळे विद्यार्थ्यांना आता नव्या जगाची ओळख होणार आहे आधुनिकतेचे शिक्षणाबरोबरच ज्ञान कौशल्यचे धडे आता विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळणार आहेत रोबोटिक अँड स्टेम लॅबच्या निर्मितीसाठी नामदार महेश शिंदे यांच्या विशेष पुढाकार मुळे च शक्य झाले आहे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आता रोबोटिकचे ज्ञान सहज उपलब्ध होणार आहे सातारा जिल्ह्यात रोबोटिक अँड स्टेम लॅब ची निर्मिती करण्याचा बहुमान प्रथमच सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल खटावला प्राप्त होत आहे अशी माहिती प्राचार्या सौ प्रमिला टकले यांनी दिली आहे या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप उपाध्यक्ष मिलिंद जगताप संचालक डॉक्टर अनिरुद्ध जगताप जयवंतराव साळुंखे अप्पा राजगे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 78 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket