तंत्रशिक्षणाची गंगा सर्वसामान्या पर्यंत पोहोचविणारे – आदरणीय सुनीलकुमार पाटीलसर
आपल्या स्वतःच्या जिद्द चिकाटी व अविरत संघर्षाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार संपन्न समाज विकासाचा ध्यास घेऊन जगणारे, विचारशील, संयमी व प्रसंगी आक्रमक व अभ्यासू असणारे,धडपड आणि सततचा संघर्ष त्यांच्या जीवनाचे जणू काही काव्य बनून राहिले ते आपल्या यशस्वी संघर्षपूर्ण वाटचालीने सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षितिजावर आपल्या उत्साही व मनमिळावू स्वभावाने नवचैतन्य निर्माण करणारे, कार्यकुशल व कर्तव्यनिष्ठ प्रेरणादायी नेतृत्व म्हणजे पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट सातारा चे संस्थापक संचालक माननीय सुनीलकुमार पाटील यांचा 61 वा वाढदिवस 20 जुलै रोजी संपन्न होत आहे. वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…..!
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात निर्मिती व सर्जनशीलतेला प्राधान्य देऊन शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारशील व कौशल्यपूर्ण सक्षम पिढी घडविण्याच्या उदात्त हेतूने सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षितिजावर आपल्या नाविण्याचा ठसा उमटवणाऱ्या पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट सातारा संस्थेची स्थापना माननीय सुनीलकुमार पाटील यांनी 35 वर्षांपूर्वी केली. साताऱ्या सारख्या ग्रामीण भागात टेक्निकल इन्स्टिट्यूट ची स्थापना ही कल्पना 35 वर्षापूर्वी पाटील सरांच्या मनात रुजली व ती कृतीत आणण्यासाठी,सततचा संघर्ष करण्याची जिद्द ही कायम ठेवलेली त्यांच्या यशस्वी वाटचालीतून दिसून येते.
श्रीमंतीची मक्तेदारी असलेल्या टेक्निकल इन्स्टिट्यूट ची शिक्षणाची कवाडे ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील गोर गरीब मुलांना सहजासहज साध्य उपलब्ध व्हावीत ही आशा बाळगून 35वर्षापूर्वी पाटील सरांनी पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट ची स्थापना करून सर्वात मोठे शिवधनुष्य पेलले.त्यांच्या सामाजिक बांधिलकीची खरी तळमळ होय. तंत्रशिक्षण क्षेत्रात आपला ठसा पाटील इलेक्ट्रॉनिक्स उमटवीत आहेत. या यशामागे त्यांच्या ठायी असणाऱ्या विशेष नेतृत्वगुणांचा संदर्भ तसेच आई-वडिलांची प्रेरणा दिसून येते.
सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही कोणत्याही परिस्थितीत त्याचा बाऊ न करता संयम व धैर्याने येणाऱ्या संकटावर मात करण्याचा आत्मविश्वास हा त्यांच्या स्वभावाचा निराळा पैलूच आहे. ग्रामीण भागात जन्म झाला असल्याने त्या भागातील समाजाच्या शैक्षणिक व मूलभूत गरजांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना होता. त्यामुळे सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांच्यात निर्माण झाली व आजही इतरांच्या सुख- दुःखात, संकट समयी मदतीचा हात पुढे करून सामाजिक उत्तरदायित्व नेहमीच जोपासतात. आई-वडिलांनी रुजवलेल्या संस्कारामुळे व आदर्श कौटुंबिक विचारांचा वारसा लाभल्याने कोणत्याही परिस्थितीवर हार न मानता सर्वांना बरोबर घेऊन तितक्याच निष्ठेने हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेणं हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव, प्रत्येकाशी आपुलकीने व नम्रतेने संवाद साधून, सर्वांशी विश्वासाचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करून मोठा मित्रपरिवार व जनसंपर्क तयार झालेला दिसतो. त्यामुळे जनसामान्यात व समाजात त्यांची एक वेगळीच प्रतिमा ठसा उमटवीत आहे त्यांच्या ठायी असणाऱ्या उत्तम संवाद कौशल्य, अभ्यासपूर्ण निर्णय क्षमता, चिकित्सक विचार शैली व संयम त्यामुळे त्यांच्या यशस्वी कार्याला वेगळी दिशा मिळाते.
शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानाबरोबरच सुसंस्कृत व आव्हान पेलण्यास सक्षम जबाबदार घडलाच पाहिजे त्यांच्या अंगी स्वावलंबन रुजवून कौशल्य निर्माण करावीत यासाठी विविध शैक्षणिक व नाविन्य उपक्रमासाठी सतत प्रयत्नांची पराकाष्ठा पाटीलसर करत असतात. पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आज यशस्वीपणे आपले करिअर घडविले आहे. टेक्निकल कोर्सेस च्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आपले स्वतचे उद्योग उभारले असून ते इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देत आहेत. यातच पाठील सरांच्या यशाचे गमक दिसून येते.
ज्ञानसेवेचा अखंड ध्यास घेऊन जगणारे पाटील सरांचे व्यक्तिमत्व समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी स्वतःचे आरोग्य व दुःख बाजूला ठेवून अहोरात्र झिजताना व झटताना दिसून येते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाटील सरांची आग्रही भूमिका असते. झोंबी या चित्रपटाची पाटील सरांनी निर्मिती केली आहे. आदरणीय पाटील सरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यांच्या या नावीन्यतेमुळे, कल्पक विचारांमुळे पाटील इलेक्ट्रॉनिक्स सातारा यशस्वी गरुड झेप घेत आहे. त्यांच्या या कार्यामध्ये परिवाराची मोठी साथ असल्याचे पाटील सर आवर्जून सांगतात. पाटील सरांचे चिरंजीव प्राचार्य सुजित पाटील पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा ची आधुनिक वाटचाल करताना दिसून येत आहेत.
मा. पाटील सर आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची क्षितीजे दिवसेंदिवस विस्तारित रहावो. आपणास आरोग्यदायी आनंददायी समृद्ध दायक चिरंतर वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!!!!!
अली मुजावर.पत्रकार,न्यूज हेड सातारा न्यूज मीडिया सेव्हन