नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » चारचाकी वाहनासाठी एमएच-50 ए ए मालिका सुरु शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा

चारचाकी वाहनासाठी एमएच-50 ए ए मालिका सुरु शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा

चारचाकी वाहनासाठी एमएच-50 ए ए मालिका सुरु शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा

सातारा -कराड व पाटण तालुक्यातील नवीन चारचाकी वाहनासाठी डि एमएच 50-ए ए ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका 15 एप्रिल 2026 रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे.

तरी इच्छुक वाहन धारकांकडून या मालिकेकरीता शासकीय नियमानुसार विहीत शुल्कासह अर्ज स्वीकारले जाणार असून ज्यांना आकर्षक क्रमांक घ्यावयाचे असतील त्यांनी 3 फेब्रुवारी रोजी कार्यालयाशी संपर्क साधून आकर्षक क्रमांकांची शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित घ्यावेत, असे कराड येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

15 एप्रिल 2026 रोजी चारचाकी वाहनांचे अर्ज क्रमांकासाठी सकाळी 10 वाजलेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत धनाकर्षासह स्विकारले जातील. ज्या आकर्षक कमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाला असेल त्या अर्जदारास त्याच दिवशी आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. एकापेक्षा अधिक अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज केल्यास अशा प्रकरणात अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जादा रकमेचे धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल.

उर्वरीत अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत परत देण्यात येतील. आकर्षक नंबर आरक्षित केल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन धारकांनी वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket