माजी सैनिक तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचारी यांची 136 पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना) पर्यावरण भरती
सातारा – माजी सैनिक तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचारी यांची 136 पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना) पर्यावरण भरती होणार आहे. ही भरती अखिल भारतीय स्तरावर माजी सैनिकांसाठी आहे. यानुसार टप्पा 2 नुसार सातारा सैनिक स्कूल, सदर बाजार, सातारा, येथे 24 ऑक्टोबर 2026 ते 27 ऑक्टोबर 2026, सकाळी 5 वाजता पासून भरती सुरु होणार आहे.
भरतीसाठी रिक्त पदे :
सैनिक (जीडी)- 129 अखिल भारतीय स्तरावर भरती
ट्रेड्समन-10- सैनिक लार्क (जीडी)-07, हाऊस कीपर-01, शेफ कम्युनिटी-01, वॉशरमन-01 – अखिल भारतीय स्तरावर भरती
माजी सैनिक (पेन्शनधारक) सशस्त्र दलातून किंवा MoEF& CC आणि राज्य वन विभागात किमान 20 वर्षे सेवा झालेली माजी महिला कर्मचारी असावी. वयोमर्यादा (ESM साठी): माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचारी यांच्यासाठी किमान वयोमर्यादा नाही, परंतु सेवामुक्ती/सेवानिवृत्तीच्या तारखेपासून 5 वर्षाच्या आत भरतीत सहभागी होणे अनिवार्य आहे. उमेदवाराचे चारित्र अनुकरणीय/अतिशय चांगले असावे. कोणत्याही दिवाणी/फौजदारी प्रकरणात सामील नसाव. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल
सैन्यातील भरती निःशुल्क व निष्पक्ष आहे. कोणालाही लाच देऊ नका आणि दलालांपासून सावध रहा. लाच दिल्याचे आढळल्यास उमेदवारी रद्द केलीजाईल तसेच कायदेशीर कारवाईही केली जाईल. कोणत्याही चौकशी अथवा स्पष्टीकरणासाठी या 9168168136 क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



