महाबळेश्वर मध्ये २६/११ हल्ल्याचा स्मरण दिवस
महाबळेश्वर:२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या भ्याड हल्यात शाहिद जवान व निष्पाप नागरिक यांच्या स्मरणार्थ महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शाहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
२६/११ हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात काळा दिवस पाळण्यात येतो. क्रूरकर्मा दहशद वादी अजमल कसाब व त्याचे ९ सहकारी यांनी मुंबई व परिसरामध्ये केलेल्या भ्याड हल्यात परदेशी व महाराष्ट्रातील शेकडो निष्पाप नागरिक यांनी आपले प्राण गमवले.या नापाक इराद्याने केलेल्या नापाक कर्माच्या विरोधात सगळ्या ठिकाणी काळा दिवस साजरा व निषेध केला जातो.
शहीद जवान विजय साळसकर,शहीद अशोक कामटे,शहीद हेमंत करकरे,विजय साळसकर,सातारा जिल्ह्यातील शाहिद तुकाराम ओंबळे ,यांच्या सारखे धाडसी पोलीस जवान देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे सर्व शाहिद जवान यांच्या स्मरणार्थ.महाबळेश्वर मधील शिवसेना, प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येत शहीद जवान यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मेणबत्ती प्रज्वलीत करून आदरांजली वाहण्यात आली.
शहरातील विविध मान्यवर यांनी झालेल्या घटनेची आठवण करून दिली. यावेळी महाबळेश्वर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्यअधिकारी योगेश पाटील,माजी नगराध्यक्ष संतोष आखाडे,माजी नगरसेवक संदीप साळुंके, शिवसेना शहर प्रमुख विजय नायडू,शिरीष गांधी, प्राध्यापक कोरे सर, उपशहरप्रमुख सचिन गुजर,सुनील ढेबे,राजेंद्र पंडित,गोविंद कदम,डेमोक्रेटिक पार्टीचे जिल्हाअध्यक्ष ऋषिकेश वायदंडे, पोलीस अधिकारी पवार साहेब, डॉ संदीप कांबळे,ओंकार दीक्षित,गणेश भांगाडिया,तुषार डोईफोडे,
वर्षा आरडे,सुनिता फळणे, आशा जाधव, सचिन जेधे,विजय चोरगे पंकज येवले,गौरव वाईकर, अर्चना जाधव पल्लवी डोईफोडे, शितल ओतारी, सुरेखा पंडित, प्रभा नायडू, अपूर्वा डोईफोडे, अल्ताफ मानकर,अस्लम डांगे, किशोर मोरे, रमेश चौधरी, पत्रकार रियाझ मुजावर, राहुल शेलार, राजेश सोंडकर,संदेश भिसे,मिलींद काळे शहरातील नागरिक अभिवादन व श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.