Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचते ती गझल:प्रा.डॉ.देवानंद सोनटक्के

रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचते ती गझल:प्रा.डॉ.देवानंद सोनटक्के

रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचते ती गझल:प्रा डॉ.देवानंद सोनटक्के

डॉ. राजन लाखे यांच्या गझलायन पुस्तकाचे प्रकाशन

सातारा- मराठी साहित्यामध्ये काव्याचे अनेक प्रकार आहेत सर्वच प्रकारांबाबत रसिकांना आकर्षण असले तरी रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचे काम मात्र गझल करते असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक समीक्षक आणि वक्ते प्राध्यापक डॉक्टर देवानंद सोनटक्के यांनी केले 

राजन लाखे यांनी लिहिलेल्या गझलायन या गझलसंग्रहाचा प्रकाशन सोहळा येथील दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ सदस्य विनोद कुलकर्णी ,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, प्रसिद्ध गझलकार आणि कवी वसंत शिंदे, लेखिका ऍड सीमंतिनी नूलकर,ज्येष्ठ गझलकार सिराज शिकलगार , दीपलक्षी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले उपस्थित होते

डॉ सोनटक्के यांनी यावेळी गझल निर्मितीमागील प्रक्रिया समजावून सांगतानाच या गझलसंग्रहात राजन लाखे यांनी लिहिलेल्या विविध गझलांचाही आढावा घेतला 

लेखक राजन लाखे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये आपल्या या पुस्तकाच्या निर्मितीची कथा सांगितली साधारण काव्य आणि गझल यामधील फरक स्पष्ट करत असतानाच गझल लिहिण्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्राची ही माहिती दिली 

विनोद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये राजन लाखे यांचा लेखक म्हणून गौरव केला आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काम ते किती आदर्शपणे करत आहेत याचीही कल्पना दिली 

ऍड सीमंतिनी नूलकर यांनी आपल्या भाषणामध्ये या गझल संग्रह ग्रहातील काही गझलांचा आढावा घेऊन या मध्ये सर्व विषयांना स्पर्श करण्यात आल्याचे सांगितले

गझलकार व कवी वसंत शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये संग्रहातील काही गजला वाचून दाखवून त्यातील सौंदर्य स्पष्ट केले राजन लाखे यांच्याकडून भविष्यात याहून अधिक चांगले गझल लेखन अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले 

पलूस येथील ज्येष्ठ गझलकार सिराज शिकलगार यांनीही यावेळी गझल म्हणजे काय हे सांगताना गझल लिहिण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागतात याबाबत मनोगत व्यक्त केले 

यावेळी लेखक राजन लाखे यांचा सत्कार देवानंद सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आला तर ज्येष्ठ गझलकार शिराज शिकलगार यांचा सत्कार विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला

यावेळी प्रख्यात संगीत शिक्षक दौलत खंडझोडे यांनी या गझल संग्रहातील काही गझल गाऊन सादर केल्या या गझलना त्यांनी स्वतः चाल लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार लेखक मुकुंद फडके यांनी केले.शिरिष चिटणीस यांनी आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 74 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket