Home » सहकार » वाई अर्बन बँकेस सर्वतोपरी सहकार्य करणार- ना. रामदास आठवले

वाई अर्बन बँकेस सर्वतोपरी सहकार्य करणार- ना. रामदास आठवले

वाई अर्बन बँकेस सर्वतोपरी सहकार्य करणार- ना. रामदास आठवले

वाई, दि. 22 – वाई व परिसरांतील विविध क्षेत्रांतील सन्माननीय सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या व 103 वर्षांची मोठी परंपरा पूर्ण करणा-या दि वाई अर्बन को. आँप. बँकेस केंद्र शासनाच्या स्तरावर सर्व ते सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त ना. आठवले यांनी वाईतील प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमांत मंत्री महोदय बोलत होते. बँकेचे अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी बोलताना ना. आठवले यांनी बँकेच्या गौरवानिमित्त आपल्या खुमासदार शैलीत चारोळी कविता सादर केली. त्यास उपस्थितांनी दाद दिली. बँकिंग कामकाज करताना येणा-या अडीअडचणी व त्याबाबतचे उपाययोजना यांची माहिती घेतली. बँकेला केंद्र शासन स्तरावर काही मदत हवी असल्यास किंवा काही समस्या असतील तर त्यांचे निराकरण केले जाईल. बँकेच्या कोणत्याही कामामध्ये आपण स्वतः लक्ष पुरवू व लागेल ती मदत देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे यांनी प्रास्ताविकात ना. आठवले यांच्याबाबतच्या आठवणी सांगितल्या. तसेच त्यांनी बँकेस भेट दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी बँकेचे माजी अध्यक्ष अरूण देव, रिपब्लिकन पक्षाचे नेते अशोक गायकवाड, माजी नगराध्यक्ष भूषण गायकवाड व रिपाईंचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

वर्धापन दिनानिमित्त प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. दिवसभरांत वर्धापन दिनी बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय जोगळेकर, सतीश शेंडे, डाँ. मधुसूदन मुजुमदार, बँकेचे माजी संचालक मिलिंद भंडारे, अँड. प्रतापराव शिंदे, सुनील शिंदे, विद्याधर तावरे, प्रा. विष्णू खरे, मनोज खटावकर, प्रा. किशोर अभ्यंकर, नरहरी महाबळेश्वरकर, माजी संचालिका श्रीमती मुळे, सौ. गीता कोठावळे, सौ. अंजली शिवदे, सौ कविता अभ्यंकर, सौ. अनुराधा जोशी, सौ. योगिनी गोखले, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, ग्राहक पंचायतीच्या सदस्या सौ. शुभदा नागपूरकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन फरांदे, बापूसाहेब शिंदे, मिलिंद पाटणकर, हेमंत येवले, संतोष जमदाडे, खटावकर, डॉ. प्रकाश पोरे, उत्तम महांगडे, सीए. डी. बी. खरात, चंद्रकांत मापारी डॉ. पराग लांबडे, डॉ. मिरजकर, डॉ बाबर, शिवाजी कदम, अरूण आदलिंगे, दत्तात्रय मर्ढेकर, भद्रेश भाटे, विश्वास पवार, धनंजय घोडके, अशोक येवले, मिलिंद पटवर्धन, शिवाजीराव जगताप, विठ्ठल माने, रिपाई नेते स्वप्नील गायकवाड, यशवंत लेले, सौ. मनीषा घैसास, विजय ढेकाणे, सतीश जेबले, लालू सावंत, यशवंत जमदाडे, वाई शहर व सातारा जिल्ह्यातील मान्यवरांनी बँकेस भेट देऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

बँकेचे संचालक विवेक पटवर्धन, माधव कान्हेरे, अँड. बाळकृष्ण पंडीत, रमेश ओसवाल, महेश राजेमहाडीक, मकरंद मुळ्ये, काशीनाश शेलार, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, प्रितम भुतकर, स्वप्नील जाधव, संचालिका सौ. ज्योती गांधी, बोर्ड आँफ मॅनेजमेंटचे सदस्य अविनाश जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, सरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे व कर्मचा-यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 10 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket