Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात पुरुषोत्तम जाधव चमत्कार करणार

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात पुरुषोत्तम जाधव चमत्कार करणार

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात पुरुषोत्तम जाधव चमत्कार करणार

सातारा :सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघातून कट्टर शिवसैनिक पुरुषोत्तम जाधव हे अपक्ष रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं या लढतीकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.पुरुषोत्तम जाधव यांचा जनसंपर्क आणि तयारीमुळं या लढतीकडं आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून प्रत्येक गाव अन् गाव पिंजून काढलेले आहे. त्यामुळे मतदारसंघात राजकीय इच्छाशक्ती टोकाला गेल्याने वाई खंडाळा महाबळेश्वरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. पुरुषोत्तम जाधव पायाला भिंगरी लावून गावोगावी भेटी देत आहेत. त्यामुळे मकरंद पाटलांसमोर आमदारकी टिकवण्याचं मोठं आव्हान निर्माण झाले आहे. 

आ.मकरंद पाटलांसाठी ही निवडणूक सोपी नसून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील वारकरी मुलाने या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव बाजीगर ठरणार की मकरंद पाटील विजयाचा चौकार मारणार हे निकालातून स्पष्ट होणार आहे.विद्यमान आमदारांचे वडिल १० वर्षे खासदार होते, तर १५ वर्षे ते आमदार अशी २५ वर्षे सत्ता त्यांच्या घरात असून देखील वाई तालुक्यातील कवठे केंजळ योजना त्यांना अद्यापर्यंत पूर्ण करता आलेली नाही. किसनवीर आबांच्या नावाने राजकारण करत असून त्यांचे स्मारक धूळखात पडले आहे, त्याचे सुशोभिकरण अजूनही यांना करता आलेले नाही. तसेच खंडाळ्यात ट्रॉमा सेंटर उभे करण्याचे काय झाले, असे अनेक प्रश्न पुरुषोत्तम जाधव यांनी वेळोवेळी उपस्थित केले आहेत.मागील १५ वर्षे आमदार असलेले मकरंद पाटील हे निष्क्रिय लोकप्रतिनिधी असून त्यांनी या मतदारसंघात काहीही केले नसल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.पुरुषोत्तम जाधव हे झुंजार नेते आहेत. विनम्र स्वभावामुळं त्यांनी गावाखेड्यात माणसं जोडली आहेत.मकरंद पाटील यांच्यापुढं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket