पुण्यात ‘जय गुजरात’ म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चे अमित शहांसमोर लोटांगण
प्रतिनिधी -आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत. हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रातील जनतेने एकवटून राज्य सरकारला निर्णय रद्द करण्यास भाग पाडलं आहे. असे असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेत संतापाची लाट उसळली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्या हस्ते कोंढवा बुद्रुक येथील जयराज स्पोर्टस कन्व्हेंशन सेंटरच्या उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी अमित शहांचं भरभरून कौतुक केलं. हिंदीत भाषणाचा शेवट करताना ‘जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात’अशी घोषणा दिली. अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेत संतापाची लाट उसळली आहे. अमित शहांना खूश करण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा करण्यासाठी लोटांगण घातल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
भाषणाच्या शेवटी शिंदे यांच्याकडून घडलेली एक चूक चर्चेचा विषय बनली आहे. शिंदे यांनी भाषण संपवताना, “जय हिंद, जय महाराष्ट्र” असे म्हणत आपले भाषण समाप्त केले. पण काही क्षणांतच त्यांना काहीतरी आठवले आणि ते पुन्हा माईकपाशी येत म्हणाले, “जय गुजरात”. या ‘जय गुजरात’ उच्चारामुळे सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर असताना, शिंदे यांच्या विधानावरून मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे
