व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 41 रुपयांची कपात
गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये ४१ रुपयांची कपात
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती ४१ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन किमती आजपासून (१ एप्रिल २०२५) लागू झाल्या आहेत.
ऑयल मार्केटिंग कंपन्यांच्या या दर कपातीच्या निर्णयामुळे ढाबे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून लागू झालेल्या या नवीन कपातीनंतर, मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १७१४.५० रुपये झाली आहे, जी पूर्वी १७५५.५० रुपये होती.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर दरम्यान घरगुती १४.२ किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. १४.२ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत ८०३ रुपये, कोलकातामध्ये ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आहे.
