समीर शेख यांच्या हस्ते भुईंज पोलीस स्टेशनचा गौरव
वाई प्रतिनिधी( शुभम कोदे)सन 2024 या संपूर्ण वर्षांमध्ये भुईंज पोलीस ठाणे यांनी चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली त्याबद्दल भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे
कामगिरी बजावल्या बद्दल सातारा पोलीस दलातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून वाई तालुक्यातील भुईंज पोलीस ठाण्याची निवड करून पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांच्या हस्ते भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गरजे व त्यांच्यां टीम ला सर्वोत्कृष्ट चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याला उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस ठाण्यास मालमत्ता हस्तगत हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. हा पुरस्कार हा गुन्हे उघडकीस आणणे, चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करणे, फरार आरोपी शोधणे, आरोपींना शिक्षा लागणे, अवैध हत्यार पकडणे, पासपोर्ट, मुद्देमाल निर्गती, तक्रारी अर्जाची निर्गती, वाहतूक कारवाया अशा प्रकारच्या सर्वोत्कृष्ट कारवाई करणाऱ्या पोलीस ठाण्याची निवड पोलीस स्टेशन म्हणून केली जाते.
गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत 2024 मध्ये चोरी झालेला माल हस्तगत करून जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून ओळख पटवून दाखवले आहे. याबाबत भुईंज पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे , कॉन्स्टेबल सागर मोहिते , सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, हवालदार नितीन जाधव यांना सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार देण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, व त्यांचे सहकारी दलातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
