मौजे कुंभरोशी येथे नाग सर्पाला मिळाले जिवदान प्रतापगड सर्च अॅन्ड रेस्क्यू टिमचे सर्वत्र कौतुक
प्रतापगङ महाबळेश्वर तालुक्यातील वाङा कुंभरोशी येथे मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. एक नाग जातीचा सर्प घरातील खिडकीच्या लोखंडी जाळीत अडकला होता. नागाला जाळीच्या बारीक छिद्रातून बाहेर येणे अश्यक्य झालेने तो चिडला होता व फुसकरत होता त्या घरातील व शेजारील लोक घाबरले होते .
स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमला याबाबत कळवले असता टीमचे सदस्य सर्पमित्र अजित जाधव, संकेत सावंत, दर्शन जाधव आणि अविष्कार केळगणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम परिस्थितीचे आकलन करून नागाला कोणतीही इजा न होता बाहेर काढण्याचे नियोजन करून त्यांनी एक्सा ब्लेड आणि पक्कड या साधनांचा वापर करून लोखंडी जाळी कापली. त्यानंतर त्यांनी नागाला सावधपणे पकडून जंगलात त्याच्या अधिवासात सोडले. या संपूर्ण कारवाईत नाग सर्पाला कोणतीही इजा झाली नाही.
प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी नागाला सुखरूपपणे त्याच्या अधिवासात सोडून पर्यावरणातील घटकाची एकप्रकारे सेवा केली आहे.