प्रतापगड घाटात बिबट्याचे दर्शन
महाबळेश्वर-थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर चा संपूर्ण परिसर जंगलांनी व्यापला असून दरवर्षी लाखो पर्यटक येथील निसर्ग सौंदर्य पाहण्या साठी येत असतात याच निसर्ग सौंदर्य बरोबर येथील जंगलं परिसरात बऱ्याच वन्यजीवांचे अस्तित्व देखील आहे . सह्याद्री पर्वत रांगांचाच एक भाग असल्याने निसर्ग सौंदर्याबरोबरच जैवाविवढतेचा वारसा देखील महाबळेश्वर ला लाभला असून या भागात रान गवा सांबर भेकर रान कुत्रे सायाळा असे बऱ्याच प्रकारचे प्राणी तसेच पक्षी सरपटणारे प्राणी येथे आढळतात येथील अन्न साखळीतील वरच्या थरावरती असणारा बिबट्या याचे देखील अस्तित्व येथील बऱ्याच भागात त्याने दाखवून दिले आहे आस पास च्या वातावरणात सहज जुळवून घेत फार पूर्वी पासून बिबट्या या भागात आपले अस्तित्व टिकवून आहे . बऱ्याचदा येथे रस्ता ओलांडताना येशील डोंगर भातात स्थानिक तसेच पर्यटकांना देखील त्याचे दर्शन अधून मधून होत असते असेच गुरुवारी रात्री काही स्थानिक युवकांना महाबळेश्वरहून वाडा कुंभरोशी येथे रात्रीच्या वेळी जात असताना मेटतळे गावाच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कठड्या वरती निवांत ठान मांडून बसलेला एक नर जातीचा पूर्ण वाढ झालेला बिबट्याचे दर्शन झाले या भागात बिबट्याचे बऱ्याचदा दर्शन होत असते पिवळ्या अंगावरती काळे ठिपके लांब सडक शेपूट सुदृढ शरीर यष्टी त्यांचे सौंदर्य पाहून युवकांना त्याचा व्हिडिओ तसेच फोटो काढण्याचा मोह आवरला नाही . या भागात बिबट्याचे दर्शन म्हणजे एक पर्वणीच असून निसर्गात त्याचे अस्तित्व निसर्ग सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग .