Home » Uncategorized » छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आणि शिवानीताई प्रितम कळसकर आयोजित छत्रपती दहीहंडी महोत्सवाचे पोस्टर उद्घाटन मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर येथे प्रदर्शित करण्यात आले.

छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आणि शिवानीताई प्रितम कळसकर आयोजित छत्रपती दहीहंडी महोत्सवाचे पोस्टर उद्घाटन मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर येथे प्रदर्शित करण्यात आले.

आला रे आला गोविंदा आला छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आणि शिवानीताई प्रितम कळसकर आयोजित छत्रपती दहीहंडी महोत्सवाचे पोस्टर उद्घाटन मा.खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर येथे प्रदर्शित करण्यात आले.

सातारा :राज्यात मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते . या पार्श्वभूमीवर सातारा शहरांमध्ये  दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आणि शिवानीताई प्रितम कळसकर आयोजित छत्रपती दहीहंडी महोत्सव बुधवार दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी तालीम संघ सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे पोस्टर उद्घाटन मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर येथे प्रदर्शित करण्यात आले.

दहीहंडी हा उत्सव एकतेचा संदेश देणारा सण आहे.दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजोशीर असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते. या दिवशी मातीच्या मडक्यात  दही,लोणी,मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते. याला फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपलातोल सांभाळत हंडी फोडतो. हंडी फोडणाऱ्या मंडळांना विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते.

यावेळी श्री काका धुमाळ, सनी भोसले, शिवानीताई प्रितम कळसकर, प्रितम कळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय, उत्कृष्ट संघटक प्रीतम कळसकर यांच्या नेतृत्वात दरवर्षी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी महोत्सवाचे नेटके नियोजन करण्यात येत असते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 13 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket