Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची लाट

महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची लाट 

महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची लाट 

महाबळेश्वर  प्रतिनिधी : तुम्हाला थंडीच्या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला यावे लागेल महाबळेश्वरला.काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून पर्यटक या गुलाबी थंडीची मजा लुटत आहेत मंगळवारी पहाटे महाबळेश्वर येथील   वेण्णालेक व लिंगमळा परिसरात दवबिंदूंचे हिमकणांमध्ये रूपांतर झाल्याचे दृश्य पाहावयास मिळाले

           वेण्णालेक – लिंगमळा परिसरात उभ्या असलेल्या वाहनांच्या टपांवर,वेण्णालेकच्या जेट्टीवर हे हिमकण काही प्रमाणात दिसले शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे पाहावयास मिळत आहेत वेण्णालेक परिसर,लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे हवामान खात्याच्य नोंदी नुसार मागील काही दिवसात किमान तपमान १० अंश ते १२ अंश डिग्री सेल्सियर्स राहत आहे सायंकाळी आणखी खाली येत आहे थंडीच्या कडाक्यामुळे वेण्णा तलाव परिसर चांगलाच गारठला होता त्यामुळे दवबिंदू गोठून काही भागात हिमकण तयार झाल्याचे फारच सुंदर दृश्य पहावयास मिळाल वेण्णा तलावावर नौकाविहार साठी बोटीमध्ये चढ उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी जेटीवर थोड्या प्रमाणात हिमकण साचल्याचे दिसत होते तर वाहनांच्या टापांवर मात्र मोठ्या प्रमाणावर हिमकण झाले असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले काही स्थानिकांनी हंगामातील या पहिल्याच झालेल्या हिमकण पाहण्याचा आनंद घेतला पर्यटनस्थळी थंडीचा कडाका वाढला असून येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक जेटीसह लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य मंगळवारी सकाळी पाहावयास मिळाले वेण्णालेक परिसरात मंगळवारी रात्री ४ अंश तापमानाही नोंद झाली असावी तर मंगळवारी पहाटे ४ ते ५ अंश तापमान असल्याची माहिती मिळाली.

      महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या चार पाच दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी रात्री थंडीत वाढ होऊन मंगळवारी सकाळी वेण्णा लेक परिसरात तापमानाचा पारा भलताच उतरल्यामुळे दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket