माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या दौऱ्यांचे आयोजन
सातारा: माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबिताच्या महसूल, पोलीस व इतर अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये जिल्ह्यातील तहसील कार्यालयात सकाळी 11 वा. कल्याण संघटकाच्या तालुका दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 30 ऑक्टोबर रोजी सातारा तहसील कार्यालय, दि.6 नोव्हेंबर रोजी पाटण तहसील कार्यालय, 11 डिसेंबर रोजी मेढा व महाबळेश्वर तहसील कार्यालय, 17 डिसेंबर रोजी कोरेगाव तहसील कार्यालयात 24 डिसेंबर रोजी खंडाळा व वाई तहसील कार्यालयात, 7 जानेवारी 2026 रोजी कराड तहसिल कार्यालयात, 13 जानेवारी 2026 रोजी फलटण तहसील कार्यालयात, 21 जानेवारी 2026 रोजी खटाव व दहीवडी येथील तहसील कार्यालयात कल्याण संघटकाच्या दौऱ्यांचे नियोजन आहे. संबधित लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल स.दै. हंगे यांनी केले आहे.




