Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » गणेशोत्सवानिमित्त अजिंक्यतारा सह. साखर कारखाना कार्यस्थळावर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

गणेशोत्सवानिमित्त अजिंक्यतारा सह. साखर कारखाना कार्यस्थळावर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

गणेशोत्सवानिमित्त अजिंक्यतारा सह. साखर कारखाना कार्यस्थळावर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव आणि कार्यकारी समिती सदस्यांनी दिली.

भुईंज- महेंद्रआबा जाधवराव सालाबादप्रमाणे यावर्षीही अजिंक्यतारा सह. साखर कारखाना कार्यस्थळावर श्री गणेशोत्सव साजरा करण्यांत येणार असून, त्यानिमित्त खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

शनिवार दि.७.९.२०२४ गणेश चतुर्थी स. १०.३० वाजता मा. आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, (महाराजसाहेब) व मा. श्रीमंत छ.सौ. वेदांतिकाराजे भोसले, (वहिनीसाहेब) आणि चेअरमन मा.श्री. यशवंत साळुंखे अध्यक्ष यांच्या शुभहस्ते व मा. संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये श्री ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

रविवार दि.८.९.२०२४ ते मंगळवार दि. १७.९.२०२४ दैनंदिन श्री ची पुजा व आरती, मंत्रजागर तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दि. १३.९.२०२४ श्री सत्यनारायण पुजा-वेळ सकाळी ९.०० वा. स्थळ-श्री भवानी माता मंदिर महाप्रसाद वेळ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० पर्यंत दुपारी १.०० ते ३.०० वाजेपर्यंत हळदी कुंकू कार्यक्रम होणार आहे.

तसेच दु.३.३० वा सिनेतारीका लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत यांचा लक्ष्मी प्रोडक्शन पुणे निर्मित अप्सरा आली, (सुत्रधार गिरीज महाजन) हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

मंगळवार दि. १७.९.२०२४ रोजी दुपारी २ वाजता साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन मा. श्री. नामदेव सावंत व कार्यकारी संचालक मा.श्री. जिवाजी मोहिते यांच्या शुभहस्ते व मा. संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये ‘श्री ‘ च्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे.

श्रीं ची आरती दररोज सकाळी ८.०० व सायंकाळी ७.०० वाजता होईल. तरी वरील सर्व कार्यक्रमांस सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष भगवान पोवार खजिनदार तानाजी कदम सचिव पांडुरंग कुंभार आणि सर्व संचालक मंडळ, गणेशोत्सव मंडळ कार्यकारी समिती सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 79 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket