Home » राजकारण » विरोधी महाविकास आघाडीकडे आजही पंतप्रधान चेहरा ठरला नाही -खा.श्री.छ.उदयनराजे भोसले 

विरोधी महाविकास आघाडीकडे आजही पंतप्रधान चेहरा ठरला नाही -खा.श्री.छ.उदयनराजे भोसले 

विरोधी महाविकास आघाडीकडे आजही पंतप्रधान चेहरा ठरला नाही -उदयनराजे भोसले 

तांबवे – आजही विरोधकाकडे पंतप्रधानाचा अजून चेहरा ठरला नाही. त्यांच्या कडे विस्कळीत महाविकास आघाडी आहे.मोदी सरकार हे विकासच सरकार आहे असे प्रतिपादन उदयनराजे भोसले यांनी केले.

तांबवे फाटा साकुर्डी पेठ येथील जय भवानी कार्यालयात महायुतीचे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी जिल्हा चे पालकमंत्री शंभूराजे देसाई, सुनिल काटकर, जयवंत शेलार ,भरत पाटील, लक्ष्मण देसाई, हणमंतराव चव्हाण, शिवाजी गायकवाड, उपसरपंच विश्वास कणसे, प्रदीप पाटील,प्रभाकर देसाई,अशोक माने,प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

उदयनराजे भोसले म्हणाले केंद्र सरकारने निती आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भरभरून विकास निधी दिलेला आहे.हा पाटण विभाग डोंगरी विभाग आहे या डोंगरी विभागांमध्ये सुद्धा नामदार शंभूराजे देसाई यांनी विकास कामातून या भागाचा कायापालट केलेला आहे .त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढेही विकास कामासाठी मी कमी पडणार नाही. उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केला

शंभूराजे देसाई म्हणाले 

 मोदी सरकार हे प्रगतीच्या दिशेने काम करणारे सरकार आहे. ही निवडणूक ही देशाचे नेतृत्व कुणी करावं ही ठरवणारी निवडणूक आहे.गेल्या दहा वर्षांत मोदी सरकार ने अनेक विकासकामे केली आहेत.महायुतीच्या उमेदवार उदयनराजे भोसले यांना निवडून पाठवा.

यावेळी प्रास्ताविक प्रकाश पाटील यांनी केले व आभार हिंमतराव थोरात यांनी मानले.

 -सुपने मंडल हे सन २००९मध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात सामाविष्ट झाले.त्या पुर्वी या विभागाला स्वर्गीय विलास काका यांनी भरभरून विकास निधी दिला आहे.त्यांच्याच प्रमाणे मीही या सुपने विभागाचे विकास कामे दिली आहेत.असे पालक मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले .

उदयनराजे भोसले म्हणाले स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर काका कधीं ही मोबाईलचा वापरही करत नव्हते.पण त्यांनी वाडी ,वस्ती,गावा येथील प्रत्येक सामान्य माणूस जोडून ठेवला आहे. त्यांच्या नंतर आमचे मित्र अँड उदयसिंह पाटील दादा यांच्या पाठीमागे काकांनी जोडलेली माणसं आजही ठामपणे सोबत आहेत ते त्यांनी केलेल्या कामाचं फलित आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket