यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये आर्किटेक्चर प्रवेशा संदर्भात ऑनलाइन मार्गदर्शन सत्र
सातारा : विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या NATA नाटा प्रवेश परीक्षेनंतर पुढे काय करावे, बी.आर्च. प्रवेश प्रक्रिया कशी असते, तसेच वास्तुकला क्षेत्रातील भविष्यातील संधी कोणत्या आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे विशेष ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. “NATA नंतर पुढे काय?” या विषयावरील हे सत्र दिनांक २५ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होईल ते Zoom माध्यमातून पार पडणार आहे.
आजच्या आधुनिक आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात वास्तुकला क्षेत्राला मोठी मागणी निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटी, ग्रीन बिल्डिंग, शाश्वत विकास, इंटिरिअर डिझाइन, अर्बन प्लॅनिंग आणि डिजिटल आर्किटेक्चर यांसारख्या नव्या संकल्पनांमुळे आर्किटेक्चर हे केवळ इमारती डिझाइन करण्यापुरते मर्यादित न राहता एक व्यापक आणि सर्जनशील करिअर क्षेत्र बनले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना योग्य वेळी अचूक माहिती मिळावी आणि करिअरबाबत योग्य दिशा मिळावी या उद्देशाने हे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.
या ऑनलाइन सत्रामध्ये विद्यार्थ्यांना वास्तुकला क्षेत्रातील विविध करिअर संधींबाबत माहिती दिली जाणार आहे. बी.आर्क. अभ्यासक्रमाची रचना, त्यामधील विषय, कौशल्य विकासाच्या संधी, प्रत्यक्ष प्रकल्पांवर आधारित शिक्षण पद्धती तसेच देश-विदेशातील करिअरच्या संधी यावर तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच NATA परीक्षेचे स्वरूप, गुणांकन पद्धती, तयारीसाठी आवश्यक बाबी आणि प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे यांची माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
तसेच बी.आर्क. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, शासकीय नियम, केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP), शिष्यवृत्ती योजना, आर्थिक सहाय्य सुविधा आणि शैक्षणिक कर्जाविषयीही सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणारे विविध विद्यार्थी प्रकल्प आणि कामांचे सादरीकरणही या सत्रात करण्यात येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वास्तुकला शिक्षणाची प्रत्यक्ष झलक अनुभवता येईल.
विद्यार्थी तसेच पालकांनी या ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेऊन वास्तुकला क्षेत्रातील करिअरविषयक शंका दूर कराव्यात आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा निवडावी, असे आवाहन यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क आर्कि. स्नेहल शेडगे – ९६६५५५०२२६, आर्कि. श्वेता धायगुडे – ९६६५६५०४७० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले




