Home » राज्य » प्रशासकीय » वनक्षेत्रात गावाचे गटाराचे पाण्याची पाईप लाईन टाकलेचा वनगुन्हा प्रकरणी एक जण ताब्यात

वनक्षेत्रात गावाचे गटाराचे पाण्याची पाईप लाईन टाकलेचा वनगुन्हा प्रकरणी एक जण ताब्यात

वनक्षेत्रात गावाचे गटाराचे पाण्याची पाईप लाईन टाकलेचा वनगुन्हा प्रकरणी एक जण ताब्यात

महाबळेश्वर -दिनांक ०५/११/२०२५ रोजी मौजे भेकवली वाडी फॉ.कं.नं. ८३ फॉ.स.नं. ५१ मध्ये गावाच्या गटाराचे पाणी सोडण्याच्या उद्देशाने जेसीबी च्या सहाय्याने पाईप लाईन टाकत असताना श्री. प्रकाश राघु ढेबे व.व.३५ रा. शिंदोळा, यांच्या वर भारतीय वनअधिनियम १९२७ अंतर्गत प्र.गु.रि.क्र. ०५/२०२५ वनरक्षक मांघर यांनी दि. ०५/११/२०२५ रोजी नोंद केला आहे. सदर गुन्ह्यामधील जेसीबी जप्त करण्यात आला असून आरोपीने गुन्हा कबूल केलेला आहे.

वनक्षेत्रात गटाराचे पाणी सोडण्यावर वनकायद्याने बंदी आहे. अश्याप्रकारे कृत्य करून वनकायद्याचे उल्लंघन केल्यास १ वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास किंवा पाच हजार रुपयापर्यंतचा द्रव्यदंड किवा या दोन्ही होऊ शकतात.

सदरची कारवाई श्री. अमोल सातपुते (भा.व.से.) उपवनसंरक्षक वनविभाग सातारा, श्री. प्रदीप रौंधळ, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा, श्री. महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. सुनील लांडगे, बनपरिमंडळ अधिकारी महाबळेश्वर, श्री. बा.भ. मराडे वनरक्षक मांघर, तुकाराम निकम वनरक्षक तळदेव, विकास रूपनूर वनरक्षक माचूतर, निलेश सपकाळ, गणेश वागदरे, रोजंदारी मजूर यांचेसमवेत पार पडली असून पुढील तपास श्री. सुनील लांडगे, वनपरिमंडळ अधिकारी महाबळेश्वर करीत आहेत.

आवाहन

तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येती कि, वनक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे वनेत्तर काम करावयाचे असल्यास वनविभागाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा वनहद्दीत विनापरवाना प्रवेश करणे तसेच अतिक्रमण करणे, प्लास्टीक कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे, शिकार करणे असे अवैध प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, अशी घटना कोणाच्या निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ वनविभागास कळवून वनविभागाला सहकार्य करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

श्री. अमोल सातपुते (भा.व.से.) उपवनसंरक्षक वनविभाग सातारा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

Post Views: 59 नशामुक्त भारत अभियान अंतर्गत QR कोड स्कॅन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन सातारा-भारत

Live Cricket