खेळातून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होते – गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे
कराड – निरोगी मन व शरीर याला खेळ खेळने महत्वाचे आहे.खेळातून विद्यार्थ्यां मध्ये नवचैतन्य निर्माण होते.असे मत गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे यांनी व्यक्त केले.
वडगांव हवेली येथे वडगांव हवेली बीट स्तरावरील क्रिडा स्पर्धा बक्षीस वितरण करताना ते बोलत होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सन्मंती देशमाने,निवास पवार, केंद्र प्रमुख राजेंद्रकुंभार, शिवाजंली सांळुखे, मुख्याध्यापक यशवंत खाडे, दिलीप जाधव,डी पी पवार, मनोज कांबळे,क्रिडा शिक्षक सुभाष कुंभार, अनिल वळवखे, महेश लोखंडे यांची उपस्थिती होती.
गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थी अंगी अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे गुण असतात त्यांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली तर ते विद्यार्थी, जिल्हा,राज्य व देशपातळीवर चांगले खेळाडू तयार होतात.विद्यार्थ्यानी खेळा बरोबर अभ्यास ही केला पाहिजे.
संन्मती देशमाने म्हणाले खेळातून निखळ मैत्री,आनंद मिळतो.खेळात हार जीत ही होत असते खिलाडूवृत्ती दाखवून खेळ केला पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शिक्षण विस्तार अधिकारी निवास पवार यांनी केले.सुत्रसंचलन सुभाष कुंभार व महेश लोखंडे यांनी केले.व आभार यशवंत खाडे यांनी मानले.