मुंबई भाजप का, मुंबई मारवाडी का!’ म्हणणाऱ्या दुकानदाराला मनसैनिकांकडून मनसे स्टाईल चोप
प्रतिनिधी -मुंबई : गिरगावामध्ये एका किराणा दुकानदाराकडून मराठी ग्राहक महिलेला आता भाजपचे सरकार आले आहे, माझ्याशी मारवाडीत बोला असे सांगण्यात आले. त्यानंतर संतप्त झालेल्या महिलांनी या दुकानदाराची तक्रार भाजपसोबतच मनसेकडे केली. मराठी माणसाला मारवाडी बोलण्याचा आग्रह करणाऱ्या दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी खेतवाडीतील कार्यालयात बोलवून चांगला चोप दिला आहे. इतकेच नाही तर त्या दुकानदाराला महिलेची माफी मागण्यास सांगितली आहे.
मराठी माणसाचा अपमान सहन करणार नाही..
‘मला माफ करा, माझी चूक झाली इथून पुढे मी मराठीतच बोलेल’ असे म्हणत दुकानदाराने मराठी भाषिकांची आणि राज ठाकरेंची माफी मागितली. परप्रांतीय लोकांची दादागिरी महाराष्ट्र अजून किती वर्ष खपवून घेणार, मराठी माणूस सहनशील आहे, मराठी माणसाने कधीच कोणाचा अपमान केलेला नाही. त्यामुळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच सहन करणार नाही, असे मनसेने म्हटले आहे.
