Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला

मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला 

मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला 

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार-नामदार जयकुमार गोरे 

सातारा : मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळील महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रीपदाचा पदभार नामदार जयकुमार गोरे  यांनी घेतला.येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा सुधारण्यावर भर देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी १०० दिवसात २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प नामदार जयकुमार गोरे यांनी केला केला.

ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाल्याने मंत्रीपदाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना राबवून खात्याचे नाव उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले. १०० दिवसांचा कार्यक्रम समोर ठेवून काम करणार असून प्रथमच राज्याला २० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे. १०० दिवसात या घरांना मान्यता देवून काम चालू करणार असल्याची ग्वाही जयकुमार गोरे यांनी दिली. पंतप्रधान यांची महत्वाकांक्षी योजना लखपती दीदी कार्यक्रम १०० दिवसात करण्याचा संकल्प यावेळी जयकुमार यांनी व्यक्त केला . ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी ५० लाख अतिरिक्त लखपती दिदी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल दादा कुल, आमदार सचिन कांबळे-पाटील,भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, श्री. अरुण गोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे देण्यात आले निवेदन 

Post Views: 125 जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे

Live Cricket